
▪️दिव्यातील आर.एन.विद्यालयातील शालेय विद्यार्थ्यांची भावनिक साद
ठाणे/दिवा ; विशेष प्रतिनिधी
सध्या ठाणे आणि महाराष्ट्रात नगरपालिका निवडणुकांचे वारे वाहू लागले असताना निवडणुकीच्या धामधुमीत राजकीय पुढारी आणि कार्यकर्ते आपल्या स्वकीय फायद्याच्या प्रचाराच्या मागे लागले आहेत.
असे असताना ठाणे महानगर पालिका निवडणुकीत दिव्याच्या विकासावर बरेच प्रश्न अनुत्तरीतच आहेत. कदाचित प्रश्न सुटतील की नेहमीप्रमाणे दिवेकरांना लॉली पॉप दाखवणार? याला कारण ठरले आर.एन विद्यालयाचे शालेय विद्यार्थी. २० नोव्हेंबर रोजी दिव्यातील मेस्टा संघटनेने पालिका प्रशासनाच्या निदर्शनास आणून देत दिवा बेडेकर नगर आर. एन. विद्यालासमोर दुभाजक हटाव आंदोलन केले होते. ह्यामध्ये शालेय विद्यार्थ्यांच्या मोठा प्रमाणात सहभाग होता तसेच विद्यार्थांच्या हातात विविध प्रकारचे सूचना फलक पहावयास मिळाले, तब्बल ३ तासाच्या नंतर दिवा प्रभाग समिती आयुक्त साहेब यांच्या मध्यस्थीनंतर आंदोलन स्थगित करून त्यावर शालेय मुलांच्या सुरक्षिततेसाठी आपण लवकरात लवकर दुभाजक हटवण्यात येईल असे सांगण्यात आहे, दिवा आगासन रस्त्यावर शालेय शाळेसमोर दुभाजक बांधले आहेत पण ते कितपत शासनाच्या नियमावलीत योग्य आणि कितपत घातक आहेत हा गमतीचा विषय शासकीय अधिकाऱ्यांनी करून ठेवला आहे, दिव्यातील शालेय परिसरात रस्त्यावरील दुभाजक ठाणे पालिका प्रशासन बांधकाम विभागाकडून जाणीवपूर्वक बांधण्यात आले आहेत? दिव्यातील रस्त्यावरील दुभाजक किती उंच असावेत, याचेही बंधन असताना त्याचेही पालन होत नाही, रस्त्यावरील अनेक दुभाजक तुटले-फुटले आहेत तर काही जाणून बुजून तोडून पादचा-यांसह वाहनचालकही तेथूनच चालू—वाट काढत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.

▪️घडलेल्या घटना
▪️ डिसेंबर २०२१ : दिवा-आगासन रस्त्यावरील खड्ड्यांमुळे एका तरुणाचा मृत्यू झाला.
- ऑगस्ट २०२२ : पुन्हा दिवा-आगासन रस्त्यावर खड्ड्यांमुळे एका तरुणाचा बळी गेला.
- जानेवारी २०२५ : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या (KDMC) कचरा गाडीने एका ७९ वर्षीय महिलेला चिरडले.
दिवा आगासन रोडवरील बेडेकर नगर येथे दुभाजक ओलांडत असताना दिपक हेमले या ज्येष्ठ नागरिकाचा जागीच मृत्यू झाला होता. त्यावेळी हे दुभाजक काढले जातील असे पालकांना वाटले होते पण सध्याच्या स्थितीला कुठलीही उपाययोजना केलेली नाही,
आर.एन विद्यालासमोरील रस्त्यावरील दुभाजक पालिका प्रशासन चिमुकल्या विद्यार्थ्यांची सुरक्षा लक्षात घेता दुभाजक तत्काळ हवणार का ह्याकडे बेडेकर नगर येथील नागरिकाचे लक्ष लागले आहे.

▪️शालेय विद्यार्थ्यांचा रस्ता ओलांडताना नाहक बळी गेल्यास आयुक्त साहेब मनुष्यवधाचा गुन्हा घेणार का? आपल्या घरी देखील लहान शालेय मुले असतील ना!!
मागील ३ वर्षे आर.एन विद्यालासमोरील दुभाजक संदर्भात पालिका प्रशासनाशी मी स्वतः जातीने पत्र पत्रव्यवहार केला. शेवटी २० नोव्हेंबर रोजी मला माझ्या शाळेतील विद्यार्थ्याना दुभाजक हटवण्यासाठी रस्त्यावर उतरव लागल. ह्यात माझा कुठलाही राजकीय हेतू नव्हता पण नाईलाज होता. आंदोलन झाले तेंव्हा आम्हाला दिवा प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त शिवप्रसाद नागरगोजे यांनी वरिष्ठांशी चर्चा करून
लवकर तोडगा काढू असे आश्वासन दिले परंतु आज १ महिना होऊनही अद्याप प्रशासनाकडून कुठल्याही प्रकारची कारवाई झाली नाही. शालेय विद्यार्थ्यांच्या विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ खेळताय नागरगोजे साहेब!!
नरेश विष्णू पवार,मेस्टा अध्यक्ष, ठाणे जिल्हा
भारत सरकार मान्यता प्राप्त RNI No.
MAHMAR2014/५९६९८



