दुनिया में जो बदलाव आप देखना चाहते हैं, वह खुद बनिए. - महात्मा गांधी
Homeमहाराष्ट्रठाणेदिव्यात निष्काळजीपणाचा बळी! साडेतीन वर्षांच्या चिमुकल्याचा कृत्रिम डबक्यात बुडून मृत्यू;

दिव्यात निष्काळजीपणाचा बळी! साडेतीन वर्षांच्या चिमुकल्याचा कृत्रिम डबक्यात बुडून मृत्यू;

दिवा ; नागेश पवार/अरविंद कोठारी

दिव्यात निष्काळजीपणाचा बळी, साडेतीन वर्षांच्या चिमुकल्याचा कृत्रिम डबक्यात बुडून मृत्यू; मृत्यूनंतर ४८ तासांच्या आत पालिकेने बुजवला खड्डा.

दिव्यात बिल्डरांच्या आणि प्रशासनाच्या निष्काळजीपणाने एका निष्पाप जिवाचा बळी घेतला आहे. साडेतीन वर्षांचा आरव खरात एका उघड्या कृत्रिम डबक्यात पडून मृत्युमुखी पडला. या हृदयद्रावक घटनेनंतर कुटुंबाने आणि सामाजिक कार्यकर्ते अमोल केंद्रे यांनी आवाज उठवल्यावर, ४८ तासांच्या आत पालिका प्रशासनाने (TMC) जेसीबीच्या साहाय्याने तो खड्डा बुजवला.

​”माझा मुलगा गेला, पण आता दुसऱ्या कुणाच्याही मुलाचा असा जीव जाऊ नये,” अशी आर्त हाक आरवच्या कुटुंबीयांनी दिली आहे. दिवा शहरात असे उघडे खड्डे सोडून देणाऱ्यांवर गुन्हे दाखल होणार का? हा खरा प्रश्न आहे.

संबंधित ख़बरें

लेटेस्ट

ख़ास ख़बरें

error: Content is protected !!