दुनिया में जो बदलाव आप देखना चाहते हैं, वह खुद बनिए. - महात्मा गांधी
Homeमहाराष्ट्रठाणे७८४ ग्रॅम गांजासह संशयित जेरबंद

७८४ ग्रॅम गांजासह संशयित जेरबंद

रत्नागिरी : दीपक माने

तालुक्यातील जयगड-नांदिवडे मार्गावरील जेएसडब्ल्यू लेबर कॉलनीच्या कंपाऊंडजवळ गांजासदृश अंमली पदार्थ
बाळगणाऱ्या एका संशयितावर जयगड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे . सिंदु कुमार राम मिस्त्री (रा. जेएसडब्ल्यू लेबर कॉलनी, नांदिवडे, रत्नागिरी) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याच्या ताब्यातून सुमारे ७८४ ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला असून त्याची अंदाजे किंमत २३ हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.
जयगड-नांदिवडे परिसरात अंमली पदार्थांची विक्री सुरू असल्याची माहिती जयगड पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी परिसरात सापळा रचून नजर ठेवली होती. दिनांक १३ फेब्रुवारी रोजी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास संबंधित संशयित हा जेएसडब्ल्यू लेबर कॉलनी परिसरात संशयास्पद हालचाली करताना आढळून आला. तपासणीदरम्यान त्याच्याकडे गांजासदृश अंमली पदार्थ सापडल्याने त्याला ताब्यात घेण्यात आले.
याप्रकरणी संशयिताविरुद्ध गुंगीकारक औषधी द्रव्ये आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम (एनडीपीएस ॲक्ट) कलम ८ (क) व २० (ब) (अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास जयगड पोलीस करत आहेत. ही यशस्वी कामगिरी पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या मार्गदर्शनाखाली संजय पाटील (स.पो. निरीक्षक), विलास दिडपसे (पो. उपनिरीक्षक) मिलिंद कदम (पोलीस हवालदार), संतोष शिंदे (पोलीस हवालदार), प्रितेष लोटणकर (पोलीस शिपाई) या पथकाने केली.

संबंधित ख़बरें

लेटेस्ट

ख़ास ख़बरें

error: Content is protected !!