
दिवा; निलेश घाग
◼️काल डोंबिवली जवळ लोकल घसरल्याने मध्य रेल्वेची सेवा विस्कळीत झाली. आजही गाड्या उशिराने धावत असल्याने प्रवाशांना प्रचंड गर्दी आणि मनस्तापाचा सामना करावा लागतोय
मध्य रेल्वेच्या डोंबिवली स्थानकाजवळ कळवा कारशेडकडून येणाऱ्या एका रिकाम्या लोकलचा डबा रूळांवरून घसरल्याने काल लोकलसेवा विस्काळीत झाली होती. त्यामुळे गाडया उशीराने धावत होत्या, परिणामी स्थानकांवर प्रचंड गर्दी झाली, ज्यामुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला. अथक प्रयत्नांनी डबा रुळांवरून हटवण्यात आला आणि अनेक तासांनी रेल्वे सेवा सुरळीत झाली. मात्र दुसऱ्या दिवशीही मध्य रेल्वेची परिस्थिती फार उत्तम नसून आजही ट्रेन उशीराने धावत आहेत.
◼️दिवा रेल्वे स्थानकात मोठ्या प्रमाणात रेल्वे पकडण्यासाठी तुफान गर्दी
काल सकाळी डोंबिवली स्थानकाजवळ लोकलचे चाक रुळावरून घसरल्याने तब्बल २ तास ३५ मिनिटे लोकल सेवा ठप्प झाली होती. या अपघातामुळे अप-डाऊन मार्गावरील सेवा विस्कळीत झाली, तसेच ९ लोकल रद्द झाल्या आणि १२ गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले होते. कोपर–कल्याण दरम्यान धीम्या मार्गावरील वाहतूक बंद असल्याने हजारो प्रवाशांचे प्रचंड हाल झाले होते . याप्रकरणाची आता चौकशी केली जाणार आहे.

जाहिरात

जाहिरात



