दुनिया में जो बदलाव आप देखना चाहते हैं, वह खुद बनिए. - महात्मा गांधी
Homeमहाराष्ट्रकल्याण रेल्वे स्थानकावर कोणार्क एक्सप्रेस मधून होणाऱ्या गांजा तस्करीचा पर्दाफास

कल्याण रेल्वे स्थानकावर कोणार्क एक्सप्रेस मधून होणाऱ्या गांजा तस्करीचा पर्दाफास

कल्याण : अमित सावंत

कल्याण रेल्वे स्थानकावर कोणार्क एक्स्प्रेसमधून होणाऱ्या गांजा तस्करीचा कल्याण रेल्वे पोलीस आणि रेल्वे सुरक्षा बलाने (RPF) संयुक्त कारवाई करत पर्दाफाश केला असून, याप्रकरणी दोन परराज्यातील तरुणांना अटक करण्यात आली आहे. निकी कुमार शाह आणि कुलदीप मंडल अशी अटक केलेल्या आरोपींची नावे असून, हे दोघे बिहारमधून गांजा घेऊन कल्याणमध्ये आले होते.

कोणार्क एक्स्प्रेस कल्याण स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक चारवर आली असता, या दोन तरुणांच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने आरपीएफ जवानांनी रेल्वे पोलिसांच्या मदतीने त्यांच्या ताब्यातील गोण्यांची कसून तपासणी केली; या झडतीत सुमारे वीस किलो गांजा जप्त करण्यात आला आहे.

पोलिसांनी या दोन्ही आरोपींना तातडीने ताब्यात घेतले असून, हा गांजा नेमका कोणासाठी आणला होता आणि कल्याणमध्ये तो कुठे पोहचवला जाणार होता, याचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

भारत सरकार मान्यता प्राप्त RNI No.
MAHMAR2014/५९६९८

संबंधित ख़बरें

लेटेस्ट

ख़ास ख़बरें

error: Content is protected !!