
दिव्यातून हरवलेली ७ वर्षीय मुलगी ३६ तासांत आईवडिलांकडे सुपूर्द..
ठाणे ; निलेश घाग
ठाणे शहरातील दिव्यात वेगळाच हायव्होल्टेज ड्रामा पहायला मिळाला. पण हा हायव्होल्टेज ड्रामा दिवा मुंब्रा पोलिसांमुळे झाला. कारण या ड्रामामुळे दिवा पोलिसांचे दिवा शहरात आणि परीसरात सध्या कौतुक होत आहे. कारण ठरली ८ वर्षांची एक मुलगी साक्षी विजयकुमार पांडे. ही ८ वर्षीय मुलगी ३ दिवसांपूर्वी हरवल्याची तक्रार तिच्या कुटुंबियांनी दिवा पोलीस चौकीत दिली होती. त्या तक़्रारीच्या आधारावर सुत्रे हलली. सहायक पोलीस आयुक्त प्रियंका डमाळे तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली दिवा (मुंब्रा) पोलीस स्टेशनच्या पथकाने गेली ३ ते ४ दिवस अहोरात्र मेहनत घेतली. या शोध मोहीमे दरम्यान दिवा ते बदलापूर परिसरातील तब्बर १००० हून अधिक CCTV कॅमेरे तपासण्यात आले. शेवटी ८ वर्षीय साक्षी विजयकुमार पांडे या हरवलेली मुलीस शोधण्यास दिवा (मुंब्रा) पोलिसांना यश मिळाले आहे.
मुलगी हरवल्याची माहिती समोर आल्यानंतर संपूर्ण दिवा शहरात चिंतेचे वातावरण पसरले होते. मात्र पोलिस प्रशासनाने तात्काळ हालचाली करत विशेष पथके तयार केली आणि विविध भागांमध्ये शोधमोहीम राबवली. दिवा शहरातील नागरिकांनी देखील मोठ्या प्रमाणावर सहकार्य करत मुलीचा शोध घेण्यासाठी मदत केली. पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी दिवस-रात्र धावपळ करत सुरू ठेवला आणि अखेर मुलगी सुखरूप पालकाच्या स्वाधीन करण्यात आली. मुलगी हरवल्याची माहिती समोर आल्यानंतर संपूर्ण दिवा शहरात चिंतेचे वातावरण पसरले होते. मात्र पोलिस प्रशासनाने तात्काळ हालचाली करत विशेष पथके तयार केली आणि विविध भागांमध्ये शोधमोहीम राबवली. दिवा शहरातील नागरिकांनी देखील मोठ्या प्रमाणावर सहकार्य करत मुलीचा शोध घेण्यासाठी मदत केली.

पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी दिवस-रात्र धावपळ करत सातत्याने तपास सुरू ठेवला आणि अखेर मुलगी सुखरूप सापडल्याने सर्वांनी सुटकेचा निश्वास टाकला. या शोध मोहीमे दरम्यान वपोनि अनिल शिंदे, पोलीस निरीक्षक पगार, सपोनि वसंत खतेले, सपोनि कोळेकर, सपोनि केदार, सपोनि सावंत… सपोनि जाधव, सपोनि माने, पोलीस उप निरीक्षक शर्मा मॅडम तसे दिवा आणि मुंब्रा पोलीस स्टेशनची संपूर्ण टीमसह नागरिकांच्या सहकार्यामुळे आणि पोलिसांच्या अथक प्रयत्नांमुळे एका चिमुकलाला सुरक्षितपणे कुटुंबापर्यंत पोहोचवण्यात यश आले.
भारत सरकार मान्यता प्राप्त RNI No.
MAHMAR2014/५९६९८

जाहिरात



