दुनिया में जो बदलाव आप देखना चाहते हैं, वह खुद बनिए. - महात्मा गांधी
Homeमहाराष्ट्रठाणेदिवा स्थानकातील नव्या पुलासाठी ब्लॉक; ठाणे- कल्याण दरम्यान लोकल ४ तास बंद...

दिवा स्थानकातील नव्या पुलासाठी ब्लॉक; ठाणे- कल्याण दरम्यान लोकल ४ तास बंद राहणार

दिवा ; निलेश घाग

मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाकडून दिवा स्थानकात नव्या पादचारी पुलाच्या तुळ्या उभारण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. या कामासाठी रात्री ब्लॉक घेण्यात येणार असून ठाणे-कल्याणदरम्यान लोकल सेवा चार तासांहून अधिककाळ बंद असेल. शनिवारी मध्यरात्री १.२० ते रविवारी पहाटे ५.४० या वेळेत विशेष वाहतूक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे.

  • या कालावधीत कळवा–डोंबिवलीदरम्यान अप आणि डाऊन धीम्या तसेच जलद मार्गावरील लोकल सेवा पूर्णपणे बंद राहतील. परिणामी, ठाणे–कल्याणदरम्यान लोकल सेवा उपलब्ध नसतील. या ब्लॉकमुळे मध्य रेल्वेने काही लोकल गाड्या पूर्णपणे रद्द करण्याचा, तर काही गाड्या अंशतः रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.
  • शनिवारी रात्री उशिरा आणि रविवारी पहाटे धावणाऱ्या अनेक लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. काही गाड्यांचा प्रवास ठाणे, कुर्ला आणि परळ स्थानकांवरच संपवण्यात येईल, तर काही गाड्या त्यांच्या मूळ स्थानकांऐवजी कुर्ला, ठाणे किंवा कल्याण येथून सुरू करण्यात येतील. तसेच ब्लॉकच्या काळात कल्याणहून सुटणाऱ्या काही अप धीम्या लोकल गाड्या ठाण्यापर्यंत अप जलद मार्गावरून वळवण्यात येणार आहेत. त्यामुळे या गाड्या ठाकुर्ली आणि कोपर स्थानकांवर थांबणार नाहीत.

जाहिरात

संबंधित ख़बरें

लेटेस्ट

ख़ास ख़बरें

error: Content is protected !!