दुनिया में जो बदलाव आप देखना चाहते हैं, वह खुद बनिए. - महात्मा गांधी
Homeमहाराष्ट्रमनात शंकांचं काहूर, अपघातात सहा जणांचा मृत्यू, मग ५ जणांचीच बॉडी कशी...

मनात शंकांचं काहूर, अपघातात सहा जणांचा मृत्यू, मग ५ जणांचीच बॉडी कशी सापडली ?

कागदाचा तुकडा जळालेला का दिसत नाही???

मुंबई :- राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बुधवारी बारामती इथं विमान अपघातात दुर्दैवी निधन झालं. मुंबईहून बारामतीकडे जात असलेलं विमान बारामती विमानतळापासून अवघ्या काही मीटर अंतरावर कोसळले आणि त्यानंतर झालेल्या मोठ्या स्फोटात अजित पवार यांच्यासह पाच जणांचा मृत्यू झाला. कामाचा माणूस अशी ओळख असलेल्या नेत्याच्या जाण्याने राज्यभर हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. मात्र या विमान अपघाताबाबत काही गंभीर शंकाही उपस्थित केल्या जात आहेत. सोशल मीडियावर याबाबतची चर्चा सुरू झाल्यानंतर आता राष्ट्रवादीचे विधानपरिषद आमदार अमोल मिटकरी यांनीही आपल्या भावना मांडत काही प्रश्न उपस्थित केले आहेत.
अमोल मिटकरी यांनी म्हटलंय की, “आदरणीय दादा गेले हे अजूनही कुणाचंच मन मानायला तयार नाही. काल देवगिरीवरील त्या दोन खुर्च्या बघून परत डोळे पाणावले. त्यातील पहिली खुर्ची ही सामान्य माणसाची कामे वा तक्रार नीट बाजूला बसून ऐकणाऱ्या व्यक्तीची आणि दुसरी खुर्ची अजितदादांची होती. मृत्यूच्या आदल्या दिवशी दुपारनंतर कुठलाच कार्यक्रम नव्हता. दादा याच ठिकाणी पक्षातील कार्यकर्त्यांना भेटल्याचे काल समजले. दुसऱ्या दिवशी याच खुर्चीवरून कामे आटोपून दादा बारामतीकडे निघाले. गेले तीन दिवस मनात शंकेचं काहूर आहे,” असं म्हणत मिटकरी यांनी हे गंभीर प्रश्न विचारले आहेत.
अमोल मिटकरींच्या मनात कोणती शंका? विचारले हे पाच प्रश्न

१ ) अपघातात ६ जणांचा मृत्यू झाला, मग प्रत्यक्षात ५ मृतदेहच का सापडले?
२) सहावी व्यक्ती कुठे गेली?
३) Take-off आधी प्रवासी यादी digitally नोंदलेली असते, मग विसंगती का?
४) एखादाही कागदाचा तुकडा जळालेला का दिसत नाही???
५) एवढ्या वेळा पायलट का बदलले गेले?

दरम्यान, “प्रश्नांचा आगडोंब उसळतोय. मृत्यूचे राजकारण करण्याचं पाप मी तरी करणार नाही. मात्र हे प्रश्न माझं मन विचारतंय आणि प्रश्न विचारणं म्हणजे अफवा नाही,” असंही अमोल मिटकरींनी म्हटलं आहे.

संबंधित ख़बरें

लेटेस्ट

ख़ास ख़बरें

error: Content is protected !!