
ठाणे ; निलेश पांडुरंग घाग
ठाणे महानगर पालिका हद्दीतील अनधिकृत फेरीवाल्यांवर महापालिकेने धडक कारवाईची मोहिम व्यापक प्रमाणात सुरु केली आहे. ठाणे महानगर पालिका अतिक्रमण विभागाकडून गुरुवारी (५ फेब्रुवारी) दिवा शहरातील आगासन रोड येथील ग्लोबल इंग्लिश स्कूल, साबे गाव तसेच दातिवली रोड येथील ठिकाणी फेरीवाल्यांवर कठोर कारवाई करुन त्यांचे सामान जप्त करण्यात आले असले तरी परप्रांतीय मुजोर फेरीवाल्यांच्या रोषाला अतिक्रमण विभागाच्या अधिकाऱ्यांना सामोरे जावे लागत आहे असे असताना अधिकाऱ्यांच्या सुरक्षेचे काय.
अतिक्रमण विभाग.पथकावर झालेले प्राणघातक हल्ले
▪️डोंबिवली येथील पूर्व भागातील उर्सेकरवाडी भागात मंगळवारी संध्याकाळी फेरिवाल्यांनी ग प्रभागाच्या फेरीवाला हटाव पथकाला धक्काबुक्की,

▪️नवी मुंबई एपीएमसीत फेरीवाल्यांचा पथकावरच थेट हल्ला

अतिक्रमण पथकावर होणारे हल्ले (उदा. वाकड 2021 मधील घटना) पाहता, आता कारवाई दरम्यान अतिरिक्त पोलीस बंदोबस्त मिळवण्यावर भर देणे गरजेचे आहे , फेरीवाल्यांच्या हल्ल्यानंतर त्यांच्यावर पोलीस गुन्हा दाखल करणे, दंड आकारणे आणि साहित्याची जप्ती यांसारखी कडक पावले उचलली जाताना कुठेही दिसत नाहीत हे कटू सत्य नाकारता येत नाही. उच्च न्यायालयाने पदपथ आणि रस्ते अतिक्रमणमुक्त ठेवण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाने पालिका प्रशासनाला कठोर उपाययोजना करण्याचे निर्देश दिले असताना त्याची अंमलबजावणी नेमके कोण करणार पालिका प्रशासन,अधिकारी शेवटी अतिक्रमण पथकाची सुरक्षा वाऱ्यावर ?

जाहिरात

जाहिरात



