दुनिया में जो बदलाव आप देखना चाहते हैं, वह खुद बनिए. - महात्मा गांधी
Homeभारतयुद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्या आधीच अमेरिकेने केला खर्ग बेटावर मोठा हल्ला

युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्या आधीच अमेरिकेने केला खर्ग बेटावर मोठा हल्ला

नवी दिल्ली

युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेने केला खर्ग बेटावर मोठा हल्ला डोनाल्ड ट्रम्प यांनी डेडलाइन संपल्यानंतर इराणवर जबरदस्त प्रहार करू अशी धमकी दिली होती. मात्र त्याआधीच इराणचा आर्थिक कणा समजला जाणाऱ्या खर्ग बेटावर अमेरिकेने हल्ला केला आहे. इराणचा महत्त्वपूर्ण तेल डेपो असलेल्या खर्ग बेटावर जोरदार हल्ले सुरू आहेत. हा हल्ला इतका भीषण आहे की संपूर्ण बेटावर स्फोटांचे आवाज ऐकू येत असल्याचं रिपोर्टमध्ये सांगण्यात आले. खर्ग बेट इराणच्या अर्थव्यवस्थेचा कणा मानला जातो कारण इराण जवळपास ९० टक्के कच्चे तेल याच बेटावरून निर्यात करते. अमेरिकेच्या या हल्ल्याने जागतिक ऊर्जा बाजारात आणखी खळबळ माजणार आहे. इराणमधील नव्या राजवटीसोबत चर्चा सुरू आहे. नव्या प्रस्तावाला इराणने मान्यता द्यायला हवी अन्यथा अमेरिका इराणला उद्ध्वस्त करेल अशी थेट धमकी देत डोनाल्ड ट्रम्प यांनी मंगळवारी रात्री ८ पर्यंत अल्टीमेटम दिला होता. इराणच्या तेल विहिरी, खर्ग बेट आणि इतकंच नाही त्यांचे जलशुद्धिकरण प्रकल्पही उडवू असा इशारा अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला होता. खर्ग बेट हे इराणच्या तेल निर्यातीचे मुख्य केंद्र मानले जाते. या बेटावर ताबा मिळवण्याचे संकेत आधीपासून डोनाल्ड ट्रम्प देत होते. यातून इराणच्या अर्थव्यवस्थेची नाडी आवळण्याची तयारी अमेरिकेने केली होती. खर्ग बेटावर कब्जा करण्याची इच्छा डोनाल्ड ट्रम्प यांनी ४० वर्षांपूर्वीच म्हणजेच १९८८ मध्येच बोलून दाखवली होती. पर्शियन आखातात स्थित खर्ग बेट इराणसाठी महत्त्वाचे आहे. ते देशातील सर्वात मोठे तेल निर्यात टर्मिनल आहे आणि इराणच्या अर्थव्यवस्थेचा एक महत्त्वाचा भाग त्यावर अवलंबून आहे. दरम्यान, खर्ग किंवा इतर तेल साठ्यांवर जर हल्ले झाले तर अमेरिकेसोबत काम करणाऱ्या कंपन्यांच्या तेल साठे आणि प्रकल्प उद्ध्वस्त करू. इतकंच नाही तर बाब-अल-मंदेब सामुद्रधुनी बंद करू असा इशारा इराणने दिला होता. त्यामुळे आता अमेरिकेच्या हल्ल्याला इराण काय प्रत्युत्तर देते हे पाहणे गरजेचे आहे. मात्र आता हे युद्ध आणखी भडकण्याची चिन्हे दिसत आहेत.

  डोनाल्ड ट्रम्प यांनी डेडलाइन संपल्यानंतर इराणवर जबरदस्त प्रहार करू अशी धमकी दिली होती. मात्र त्याआधीच इराणचा आर्थिक कणा समजला जाणाऱ्या खर्ग बेटावर अमेरिकेने हल्ला केला आहे. इराणचा महत्त्वपूर्ण तेल डेपो असलेल्या खर्ग बेटावर जोरदार हल्ले सुरू आहेत. हा हल्ला इतका भीषण आहे की संपूर्ण बेटावर स्फोटांचे आवाज ऐकू येत असल्याचं रिपोर्टमध्ये सांगण्यात आले. खर्ग बेट इराणच्या अर्थव्यवस्थेचा कणा मानला जातो कारण इराण जवळपास ९० टक्के कच्चे तेल याच बेटावरून निर्यात करते. अमेरिकेच्या या हल्ल्याने जागतिक ऊर्जा बाजारात आणखी खळबळ माजणार आहे.
 इराणमधील नव्या राजवटीसोबत चर्चा सुरू आहे. नव्या प्रस्तावाला इराणने मान्यता द्यायला हवी अन्यथा अमेरिका इराणला उद्ध्वस्त करेल अशी थेट धमकी देत डोनाल्ड ट्रम्प यांनी मंगळवारी रात्री ८ पर्यंत अल्टीमेटम दिला होता. इराणच्या तेल विहिरी, खर्ग बेट आणि इतकंच नाही त्यांचे जलशुद्धिकरण प्रकल्पही उडवू असा इशारा अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला होता. 
   खर्ग बेट हे इराणच्या तेल निर्यातीचे मुख्य केंद्र मानले जाते. या बेटावर ताबा मिळवण्याचे संकेत आधीपासून डोनाल्ड ट्रम्प देत होते. यातून इराणच्या अर्थव्यवस्थेची नाडी आवळण्याची तयारी अमेरिकेने केली होती. खर्ग बेटावर कब्जा करण्याची इच्छा डोनाल्ड ट्रम्प यांनी ४० वर्षांपूर्वीच म्हणजेच १९८८ मध्येच बोलून दाखवली होती. पर्शियन आखातात स्थित खर्ग बेट इराणसाठी महत्त्वाचे आहे. ते देशातील सर्वात मोठे तेल निर्यात टर्मिनल आहे आणि इराणच्या अर्थव्यवस्थेचा एक महत्त्वाचा भाग त्यावर अवलंबून आहे. 
  दरम्यान, खर्ग किंवा इतर तेल साठ्यांवर जर हल्ले झाले तर अमेरिकेसोबत काम करणाऱ्या कंपन्यांच्या तेल साठे आणि प्रकल्प उद्ध्वस्त करू. इतकंच नाही तर बाब-अल-मंदेब सामुद्रधुनी बंद करू असा इशारा इराणने दिला होता. त्यामुळे आता अमेरिकेच्या हल्ल्याला इराण काय प्रत्युत्तर देते हे पाहणे गरजेचे आहे. मात्र आता हे युद्ध आणखी भडकण्याची चिन्हे दिसत आहेत.

संबंधित ख़बरें

लेटेस्ट

ख़ास ख़बरें

error: Content is protected !!