दुनिया में जो बदलाव आप देखना चाहते हैं, वह खुद बनिए. - महात्मा गांधी
Homeमहाराष्ट्रअखेर विजय भोईर यांच्या प्रयत्नांना यश; दिवा शहराला मिळाला नवीन पिनकोड;

अखेर विजय भोईर यांच्या प्रयत्नांना यश; दिवा शहराला मिळाला नवीन पिनकोड;

दिवा; निलेश पांडुरंग घाग

दिवा आणि मुंब्रा शहराचा समान पिनकोड असल्यामुळे नागरिकांना टपाल वितरणासह विविध शासकीय आणि ऑनलाइन सेवांमध्ये अडचणींचा सामना करावा लागत होता. मात्र, दिवा शहरासाठी स्वतंत्र पिनकोड मिळावा, या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मागणीला अखेर यश आले असून दिव्यासाठी ४००६११ हा स्वतंत्र पिनकोड जाहीर करण्यात आला आहे. नवीन पिनकोडमुळे दिव्याची स्वतंत्र ओळख निर्माण होण्यास मदत होणार आहे.

  • दिव्याला स्वतंत्र पिनकोड मिळावा यासाठी जागा हो दिवेकर या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून विजय भोईर यांचा गेली अनेक वर्षे सातत्याने पाठपुरावा

दिवा आणि मुंब्रा यांचा एकच पिनकोड असल्याने नागरिकांना टपाल वितरण, शासकीय कागदपत्रे, बँक व्यवहार, ऑनलाइन सेवा आणि विविध प्रशासकीय कामांमध्ये अडचणींचा सामना करावा लागत होता. या समस्या लक्षात घेऊन वेळोवेळी विजय भोईर यांनी ठाण्याचे आमदार संजय केळकर आणि निरंजन डावखरे यांच्यामार्फत हा विषय पक्षश्रेष्ठी व संबंधित विभागांच्या निदर्शनास आणून दिला होता. याशिवाय त्यांनी थेट दिल्लीपर्यंत पत्रव्यवहार करून या मागणीची गरज अधोरेखित केली. माजी खासदार विनय सहस्त्रबुद्धे यांची भेट घेऊन त्यांनी स्वतंत्र पिनकोडची आवश्यकता पटवून दिली होती.

दिव्यासाठी ४००६११ हा स्वतंत्र पिनकोड मंजूर झाल्याने शहराची स्वतंत्र ओळख अधिक मजबूत होणार असून टपाल वितरण व्यवस्थेतही सुसूत्रता येण्यास मदत होणार आहे. तसेच नागरिकांना विविध शासकीय व खासगी सेवांचा लाभ घेताना होणारा गोंधळ कमी होणार आहे.

दिव्याच्या विकासाच्या दृष्टीने हा महत्त्वाचा टप्पा मानला जात असून शहराच्या स्वतंत्र प्रशासकीय ओळखीला यामुळे बळ मिळणार असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली.

भारत सरकार मान्यता प्राप्त RNI No.
MAHMAR2014/५९६९८

संबंधित ख़बरें

लेटेस्ट

ख़ास ख़बरें

error: Content is protected !!