दुनिया में जो बदलाव आप देखना चाहते हैं, वह खुद बनिए. - महात्मा गांधी
Homeमहाराष्ट्रउरण मध्ये अनोळखी व्यक्तीचा मृत्यू पोलिसांसमोर ओळख पटवण्याचे आव्हान

उरण मध्ये अनोळखी व्यक्तीचा मृत्यू पोलिसांसमोर ओळख पटवण्याचे आव्हान

नवी मुंबई; राहुल अहिरे

उरण पोलीस ठाण्याच्या क्षेत्रात पंजाब ब्रीजचे बाजुला, पनवेल- जे.एन.पी.टी पश्चिम वाहीनी मार्गिकेवर, ११ ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी ३ वाजता एक अनोळखी व्यक्ती मृत अवस्थेत आढळून आली. मृत व्यक्तीचे वर्णन साधारण ३० ते ३५ वर्ष, निळ्या रंगाचा हाफ बाह्याचा टिशर्ट, गडद निळ्या रंगाची फुल ट्रैक पँन्ट, चेह-यावरील त्वचा निघालेली असे आहे.

पोलीस उपनिरीक्षक संजय साबळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत व्यक्तीची ओळख पटविण्यासाठी पोलीस तात्पुरते कार्यवाही केली असून उरण पोलीस ठाण्यात अ.मृ. रजि. नं. ८८/२०२५ भा.ना.सु. संहीता कलम १९४ प्रमाणे वरील घटना दाखल करण्यात आलेली आहे

सदर अनोळखी मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी पोलीसांनी आवाहन केले आहे. कोणालाही सदर व्यक्तीची माहिती असल्यास उरण पोलीस ठाणे किंवा पोलीस उपनिरीक्षक संजय साबळे (मो.नं. 9422940225) यांच्याशी संपर्क साधावा.

संबंधित ख़बरें

लेटेस्ट

ख़ास ख़बरें

error: Content is protected !!