दुनिया में जो बदलाव आप देखना चाहते हैं, वह खुद बनिए. - महात्मा गांधी
Homeमहाराष्ट्रएमआयएमला महाराष्ट्रात मोठं यश, २९ महानगरपालिकांमध्ये ९५ उमेदवार विजयी

एमआयएमला महाराष्ट्रात मोठं यश, २९ महानगरपालिकांमध्ये ९५ उमेदवार विजयी

मुंबई : प्रतिनिधी

मुंबई : मुंबईसह राज्यातील २९ महापालिका निवडणुकींचे निकाल जाहीर होत आहेत. भाजपला महापालिका निवडणुकीत सर्वाधिक जागा मिळताना पाहायला मिळत आहेत. या निकालातील महत्त्वाची बाब म्हणजे असदुद्दीनं ओवेसी यांच्या एमआयएमनं महापालिका निवडणुकीत मोठी मुसंडी मारली आहे. महाराष्ट्रातील २९ पैकी १३ महापालिकेत एमआयएमचे ९५ उमेदवार विजयी झाले आहेत. विशेष बाब म्हणजे एमआयएमनं मुंबईत देखील जोरदार मुसंडी मारली आहे. अबू आझमी यांच्या समाजवादी पक्षाचा गड असलेल्या मानखुर्दमध्ये देखील एमआयएमनं दमदार विजय मिळवला आहे. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका निवडणुकीत एमआयएम दुसऱ्या स्थानावर आहे.

एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी राज्यभरात विविध ठिकाणी महापालिका निवडणुकीसाठी सभा घेतल्या होत्या. मुंबईत एमआयएमनं जोरदार मुसंडी मारली आहे.

मुंबईतील एमआयएमच्या विजयी उमेदवारांची यादी १३४- मेहजबिन खान – एमआयएम

१३६- जमीर कुरेशी – एमआयएम

१३७- समीर पटेल- एमआयएम

१३८- रोशन शेख- एमआयएम

१३९- शबाना शेख- एमआयएम

१४५- खैरुनिसा हुसेन- एमआयएम

एमआयएमन महाराष्ट्रातील २९ महापालिकांमध्ये ९५ जागांवर विजय मिळवला आहे. २९ पैकी १३ महापालिकांत एमआयएमचे ९५ नगरसेवक विजयी झाले आहेत. छत्रपती संभाजनगरमध्ये उमदेवार निवडीत मोठा राडा पाहायला मिळाला होता. त्या छत्रपती संभाजीनगरमध्ये एमआयएमनं २४ जागांवर विजय मिळवला आहे. मालेगावमध्ये एमआयएमचे २० उमेदवार विजयी झाले आहेत.

सोलापूर, धुळे, नांदेडमध्ये प्रत्येकी ८ याप्रमाणं एमआयएमचे २४ उमेदवार या तीन महानगरपालिकांमधून विजयी झाले आहेत. समाजवादी पार्टीला मागे सारत एमआयएमची सरशी झाल्याचं पाहायला मिळालं आहे. एमआयएमचे अमरावतीत ६, ठाण्यात ५, नागपुरात ४ नगरसेवक विजयी झाले आहेत. चंद्रपूरमध्ये देखील एमआयएमनं विजयाचं खातं उघडलं आहे.

दरम्यान, एमआयएमसाठी पक्षाचे प्रमुख असदुद्दीनं ओवेसी यांनी राज्यभरात सभा घेतल्या होत्या. एमआयएमच्या अकोल्यातील सभेवेळी मोठा गदारोळ झाल्याचं पाहायला मिळालं होतं. छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील इम्तियाज जलील यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न झाला होता. या सर्व वादाच्या पार्श्वभूमीवर एमआयएमनं महाराष्ट्रात मोठं यश मिळवल्याचं बोललं जातेय.

संबंधित ख़बरें

लेटेस्ट

ख़ास ख़बरें

error: Content is protected !!