दुनिया में जो बदलाव आप देखना चाहते हैं, वह खुद बनिए. - महात्मा गांधी
Homeमहाराष्ट्रमुंबईतील मनसेच्या विजयी उमेदवारांची यादी, कोण-कोण जिंकलं?

मुंबईतील मनसेच्या विजयी उमेदवारांची यादी, कोण-कोण जिंकलं?

मुंबई; प्रतिनिधी

मुंबई महानगरपालिका निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. या निवडणुकीत भाजप आणि शिवसेना यांच्या युतीला मोठे यश मिळताना दिसत आहे. तर ठाकरे बंधूंना या निवडणुकीत अपेक्षित यश मिळाले नाही. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे ५७ उमेदवार आघाडीवर आहेत. तर राज ठाकरे यांच्या मनसेचे फक्त ९ उमेदवार सायंकाळपर्यंत आघाडीवर होते आहेत. हा राज ठाकरे यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे.

विधानसभा निवडणुकीतील यशानंतर मुंबईत भाजप एकतर्फी विजय मिळवेल, अशी चर्चा होती. मात्र, ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर मुंबईतील वातावरण पालटले होते. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवाजी पार्कमधील सभेनंतर या निवडणुकीत आणखी रंगत आली होती. मुंबईतील आजचा निकाल पाहता मराठीबहुल परिसरात ठाकरे बंधूंना भरभरुन मतं पडल्याचे दिसत आहे. मात्र, भाजपचे त्यांचे पारंपरिक मतदार आणि अमराठी मतदारांच्या जोरावर ९० च्या आसपास जागा मिळवल्या आहेत.

मुंबईतील मनसेच्या विजयी उमेदवारांची यादी मिळालेल्या माहितीनुसार

  • प्रभाग क्रमांक ३८ मनसेच्या सुरेखा परब विजयी…
  • प्रभाग क्रमांक ७४ मधून विद्या आर्या मनसेच्या उमेदवार विजयी…
  • प्रभाग क्रमांक १२५ मनसेच्या सई शिर्के विजयी…
  • प्रभाग क्रमांक २०५ मधून मनसेच्या सुप्रिया दळवी विजयी
  • वॉर्ड क्रमांक ११५ मधून मनसे ज्योती राजभोज विजयी
  • प्रभाग क्रमांक ११० मनसे उमेदवार हरी नाक्षी चिराथ विजयी.
संबंधित ख़बरें

लेटेस्ट

ख़ास ख़बरें

error: Content is protected !!