
ठाणे ; निलेश घाग
ठाणे महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडीतून बाहेर पडत स्वबळावर निवडणुक लढविणाऱ्या काँग्रेसचे तसेच महाविकास आघाडीतून निवडणुक लढविणाऱ्या मनसेचा एकही उमेदवार विजयी झालेला नाही. विशेष म्हणजे, काँग्रेस पक्षाचे ठाणे जिल्हाध्यक्ष विक्रांत चव्हाण आणि मनसेचे ठाणे शहराध्यक्ष रविंद्र मोरे या दोघांचाही पराभव झाला आहे. यानिमित्ताने या दोन्ही पक्षांचे यंदाच्या निवडणुकीत अपयश म्हणावे लागेल.

शिवसेनेतील फुटीनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ६७ पैकी ६५ नगरसेवकांनी साथ दिली. विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत शिंदे यांचे उमेदवार विजयी झाले होते. या निवडणुकांमधून तेच ठाणेदार असल्याचे त्यांनी दाखवून दिले होते. एकूण उपमुख्यमंत्री शिंदे यांचे ठाण्यात मोठे वर्चस्व आहे. या वर्चस्वाला आव्हान देण्याची रणनिती विरोधकांकडून आखली जात होती. त्याचाच एक भाग म्हणून शिवसेना (उबाठा), मनसे, राष्ट्रवादी (शरद पवार ) आणि काँग्रेस पक्षाकडून महाविकास आघाडीची मोट बांधण्यात येत होती.
महाविकास आघाडीच्या जागा वाटपामध्ये काँग्रेस पक्षाने २२ ते २५ जागा देण्याचा प्रस्ताव दिला होता. मात्र, उबाठा आणि मनसेकडून केवळ पाच ते सहा जागा काँग्रेसला देण्यात येत होत्या. हा प्रस्ताव मान्य नसल्यामुळे काँग्रेसने वेगळा विचार सुरू केला होता. काँग्रेस पक्षाचे ठाणे जिल्हाध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी आघाडीतून बाहेर पडून स्वबळाचा नारा दिला होता. काँग्रेसने शंभरहून अधिक ठिकाणी उमेदवार उभे केले होते. तसेच विक्रांत चव्हाण हे सुद्धा निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. या निवडणुकी चव्हाण यांच्यासह काँग्रेसच्या सर्वच उमेदवारांचा पराभव झाला आहे. गेल्या निवडणुकीत त्यांचे तीन उमेदवार निवडून आले होते. यंदा एकही उमदेवार निवडून नाही



