दुनिया में जो बदलाव आप देखना चाहते हैं, वह खुद बनिए. - महात्मा गांधी
Homeमहाराष्ट्रओशिवारात इमारतीवर गोळीबार; अनेक जण थोडक्यात बचावले

ओशिवारात इमारतीवर गोळीबार; अनेक जण थोडक्यात बचावले

मुंबई ; प्रतिनिधी

मुंबईतील ओशिवारा परिसरात एक खळबळजनक गोळीबाराची घटना घडली आहे. एका अज्ञात व्यक्तीने इमारतीवर गोळीबार केला आणि घटनास्थळावरून पळ काढला. पोलीसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत तपास सुरु केला आहे.

ओशिवरा पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या नालंदा सोसायटीमध्ये ही गोळीबाराची घटना घडली. गोळीबारानंतर आरोपी पळून गेले. सुदैवाने, या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. घटनेची माहिती मिळताच ओशिवरा पोलिस घटनास्थळी पोहोचले आणि इमारतीतील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यासह तांत्रिक तपास सुरू केला. पोलिस आरोपीचा शोध घेत आहेत.

घटनेची माहिती मिळताच, ओशिवरा पोलिसांचा मोठा ताफा घटनास्थळी पोहोचला. पोलिसांनी संपूर्ण इमारतीला वेढा घातला आहे आणि फॉरेन्सिक तज्ज्ञांच्या मदतीने पुरावे गोळा करत आहेत. पोलिस अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, हल्लेखोराची ओळख पटविण्यासाठी आणि त्याचा हेतू निश्चित करण्यासाठी तपास सुरू करण्यात आला आहे.

संबंधित ख़बरें

लेटेस्ट

ख़ास ख़बरें

error: Content is protected !!