
ठाणे ; विशेष प्रतिनिधी
ठाणे महापालिका निवडणुकीत दिवा, खारिगाव, कळवा तसेच ठाणे येथील विविध प्रभागांमधील शिवसेनेच्या १० विजयी नगरसेवकांनी आज सदिच्छा भेट घेतली. यावेळी ठा.म.पा माजी उप महापौर रमाकांत मढवी, शैलेश पाटील, आदेश भगत, दिपाली भगत, स्नेहा पाटील, दीपक जाधव, दर्शना म्हात्रे साक्षी मढवी, बाबाजी पाटील, अर्चना पाटील या सर्व विजयी नगरसेवकांचे मनःपूर्वक अभिनंदन करत पुढील राजकीय आणि सामाजिक वाटचालीसाठी खूप शुभेच्छा दिल्या. जनतेने आपल्यावर विश्वास ठेवून प्रचंड मताधिक्याने विजयी केले आहे. या विश्वासाला सार्थ ठरवत सर्वांनी प्रभागात उत्तम पद्धतीने काम करा, असे आवाहनही यावेळी केले. यावेळी स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.



