दुनिया में जो बदलाव आप देखना चाहते हैं, वह खुद बनिए. - महात्मा गांधी
Homeमहाराष्ट्रकल्याण खडकपाडा पोलिसांनी सराईत इराणी चोरट्याला ठोकल्या बेड्या; सराईत चोरटा मोहम्मद इराणी...

कल्याण खडकपाडा पोलिसांनी सराईत इराणी चोरट्याला ठोकल्या बेड्या; सराईत चोरटा मोहम्मद इराणी गजाआड ,

ठाणे :- निलेश घाग

डझन हुन अधिक पोलीस असल्याची बतावणी करत लूट,जबरी चोरी,चैन स्नेचिंगसारखे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असलेला सराईत इराणी चोरटा मोहम्मद सय्यद अली उर्फ मोहम्मद इराणी याला कल्याण खडकपाडा पोलीस आणि पिंपरी चिंचवड पोलिसांनी संयुक्त कारवाई करत बेड्या ठोकल्या .पोलिसांची चाहूल लागताच मोहम्मद इराणी याने पळून जाण्याचा प्रयत्न केला मात्र काही अंतरावर फिल्मी स्टाईल थरारक पाठलाग करत पोलिसांनी बेड्या ठोकल्या .मोहम्मद इराणी यांनी पिंपरी चिंचवड परिसरात पोलीस असल्याची बतावणी करत सोन्याचे दागिने लुटल्याचा गुन्हा दाखल होता .पिंपरी चिंचवड पोलीस त्याच्या मागावर होते .त्यांना मोहम्मद इराणी आंबिवली इराणी वस्तीत लपून बसला असल्याची माहिती मिळाली पिंपरी चिंचवड पोलीस आणि याबाबत कल्याणचे डीसीपी अतुल झेंडे यांच्याशी संपर्क साधला डीसीपी अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली खडकपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमर वाघमोडे, पी एस आय भूषण देवरे यांच्या पथकाने पिंपरी चिंचवड पोलिसांच्या पथकासह आंबिवली इराणी वस्तीत सापळा रचला . पोलिसांची चाहूल लागताच मोहम्मद पळून जाण्याचा प्रयत्न केला पोलिसांच्या पथकाने मोठ्या धाडसाने मोहम्मद झपाटलं करत अवघा काय अंतरावरच मोहम्मद इराणी याला बेड्या ठोकल्या . मोहम्मद याच्या अटकेचा हा थरार सीसीटीव्ही कॅमेरात कैद झालाय मोहम्मद विरोधात मुंबई, पुणे ,ठाणे सह कर्नाटक राज्यातील पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत . खडकपाडा पोलिसांनी मोहम्मद इराणी याला पिंपरी चिंचवड पोलिसांच्या ताब्यात दिले असून पुढील तपास पिंपरी चिंचवड पोलीस करत आहेत.

संबंधित ख़बरें

लेटेस्ट

ख़ास ख़बरें

error: Content is protected !!