
मुंबई; प्रतिनिधी
या स्पर्धेसाठी १ जानेवारी, २०२५ ते ३१ डिसेंबर, २०२५ या कालावधीत प्रसिद्ध झालेल्या लेखन/छायाचित्रे/वृत्तकथा यांच्या प्रवेशिका मागविण्यात येत आहेत. प्रवेशिका पाठविण्याचा अंतिम दिनांक १५ मार्च, २०२६ असा आहे.
राज्यातील विविध भागातील स्पर्धकांनी संबंधित जिल्हा माहिती कार्यालयाकडून तर मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यातील इच्छुकांनी, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, तळमजला, हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा मार्ग, मंत्रालय, मुंबई- ३२ येथून विहित नमुन्यातील अर्ज प्राप्त करुन घ्यावयाचे आहेत. अर्जाचे नमुने https://dgipr.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
यासंदर्भातील सविस्तर वृत्त – https://mahasamvad.in/190552/



