
ठाणे; विशेष प्रतिनिधी
कल्याण आणि डोंबिवली शहरात घडलेल्या दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये तक्रारदारांची एकूण ६३ लाख ६५ हजार रुपयांची आर्थिक फसवणूक झाल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणी कल्याणमधील खडकपाडा पोलीस ठाणे आणि डोंबिवलीतील मानपाडा पोलीस ठाणे येथे स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
डोंबिवलीतील लोढा पलावा परिसरात राहणाऱ्या भावना देवकर यांनी पुणे येथील सलील श्रीपाद मेहेंदळे यांच्याविरोधात मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. आर्थिक व्यवहारात विश्वासघात करून मोठी रक्कम उकळल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
दरम्यान, कल्याणमधील खडकपाडा भागात राहणारे विजय झाडे यांनी मनीष कुमार मिश्रा आणि सिद्धेश यांच्याविरोधात खडकपाडा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे.
दोन्ही प्रकरणांचा पुढील तपास संबंधित पोलीस ठाण्यांकडून सुरू आहे.



