दुनिया में जो बदलाव आप देखना चाहते हैं, वह खुद बनिए. - महात्मा गांधी
Homeमहाराष्ट्रकल्याण डोंबिवली हद्दीतील स्मशानभूमीचे होणार नूतनीकर

कल्याण डोंबिवली हद्दीतील स्मशानभूमीचे होणार नूतनीकर

कल्याण ; विशेष प्रतिनिधी

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने शहरातील स्मशानभूमींच्या नूतनीकरणाचा मोठा निर्णय घेतला असून, यामुळे अनेक वर्षांपासून भेडसावत असलेल्या अपुऱ्या सुविधांच्या समस्येला दिलासा मिळणार आहे. नुकत्याच सादर झालेल्या अर्थसंकल्पात स्मशानभूमींच्या उभारणी व आधुनिकीकरणासाठी मोठी तरतूद करण्यात आली आहे.

महापालिका क्षेत्रात एकूण ६८ स्मशानभूमी असून, त्यापैकी २६ कल्याण विभागात तर ४२ डोंबिवली विभागात आहेत. मात्र, अनेक ठिकाणी मूलभूत सुविधांचा अभाव असल्याने नागरिकांना अंत्यसंस्कारावेळी अडचणींचा सामना करावा लागत होता. या पार्श्वभूमीवर केडीएमसीने विविध स्मशानभूमींच्या पुनर्निर्माण आणि सुधारणा कामांना गती दिली आहे.

सध्या आधारवाडी, लालचौकी, बैलबाजार, मुरबाड रोड, विठ्ठलवाडी, टिटवाळा परिसरातील थारवानी कॉम्प्लेक्स तसेच डोंबिवली-पूर्वेतील शिवमंदिराजवळील मोक्षधाम आणि कोळेगाव येथील स्मशानभूमींचे काम सुरू आहे. याशिवाय काटई, उंबरलीनगर, कॅसारिओ, खडेगोळवली आणि माणोरे गाव येथे नवीन स्मशानभूमी उभारण्याचे प्रस्तावही अर्थसंकल्पात मांडण्यात आले आहेत.

कल्याण-शीळ मार्गावरील कोळेगाव येथील काम अंतिम टप्प्यात असून, पूर्ण झाल्यानंतर स्थानिक नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. सध्या डोंबिवली-पूर्वेतील शिवमंदिर, पाथली, ठाकुर्ली, चोळेगाव आणि रेल्वे समांतर रस्त्यावरील स्मशानभूमींवर मोठा ताण आहे. इतर ठिकाणी सुविधा नसल्यामुळे त्यांचा वापर कमी होत होता.

नवीन प्रकल्प आणि नूतनीकरणामुळे सर्व स्मशानभूमींमध्ये आवश्यक सुविधा उपलब्ध होणार असून, त्यामुळे प्रमुख ठिकाणांवरील ताण कमी होईल. तसेच लोढा हेवन आणि पलावा परिसरातील नागरिकांना अंत्यसंस्कारासाठी होणारी गैरसोयही मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे.

संबंधित ख़बरें

लेटेस्ट

ख़ास ख़बरें

error: Content is protected !!