दुनिया में जो बदलाव आप देखना चाहते हैं, वह खुद बनिए. - महात्मा गांधी
Homeमहाराष्ट्रठाणे पोलिसांची अंमली पदार्थांविरोधात मोठी कारवाई ;४ कोटी रुपये किमतीचे एमडी ड्रग्ज...

ठाणे पोलिसांची अंमली पदार्थांविरोधात मोठी कारवाई ;४ कोटी रुपये किमतीचे एमडी ड्रग्ज जप्त

ठाणे ; विशेष प्रतिनिधी

ठाणे शहरात अंमली पदार्थांविरोधात मोठी कारवाई करत पोलिसांनी सुमारे ४ कोटी रुपये किमतीचे एमडी ड्रग्ज जप्त केले असून या प्रकरणात तिघांना अटक करण्यात आली आहे.

ठाणे पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे सापळा रचून संशयितांना ताब्यात घेतले असता त्यांच्या जवळून मोठ्या प्रमाणात एमडी ड्रग्ज हस्तगत करण्यात आले.

जप्त करण्यात आलेल्या 4 कोटी 12 लाख 40 हजार रुपये किमतीच्या अमली पदार्थांचे वजन अंदाजे २ किलो 62 ग्राम असून या प्रकरणी आरोपींवर एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे शहरातील ड्रग्स तस्करीवर आळा बसण्याची अपेक्षा व्यक्त होत असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

संबंधित ख़बरें

लेटेस्ट

ख़ास ख़बरें

error: Content is protected !!