दुनिया में जो बदलाव आप देखना चाहते हैं, वह खुद बनिए. - महात्मा गांधी
Homeमहाराष्ट्रडबक्यात पडून ६ वर्षीय मुलीचा दुर्दैवी मृत्यू; डायघर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

डबक्यात पडून ६ वर्षीय मुलीचा दुर्दैवी मृत्यू; डायघर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

ठाणे ; निलेश पांडुरंग घाग

दिवा येथील शिळफाटा परिसरात शुक्रवारी सायंकाळी मित्र मैत्रिणींसह खेळत असताना एका ६ वर्षीय मुलीचा डबक्यात पडून मृत्यू झाल्याची घटना शनिवारी उघडकीस आली आहे. या प्रकरणी डायघर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

कशफ नबीला खान (०६) असे मृत मुलीचे नाव आहे. ती शिळफाटा येथील आशना हाईट्स येथे राहत होती. शुक्रवारी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास ती आपल्या मित्र मैत्रिणींसह घराशेजारील परिसरात खेळत होती. यावेळी खेळत असताना परिसरात सुरू असलेल्या बांधकामाच्या ठिकाणी ती पोहचली. दरम्यान ती पाण्याच्या डबक्यात तोल जाऊन पडली. त्यानंतर तिच्या कुटुंबियांनी शोध घेण्याचा
प्रयत्न केला. मात्र, ती कुठेही सापडली नाही. म्हणुन त्यांनी पोलिसात तक्रार नोंदवली. घटनेची माहिती मिळताच, घटनास्थळी शिळ अग्निशमन
केंद्राचे स्थानक अधिकारी, डायघर पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी तसेच अग्निशमन दलाचे जवान दाखल झाले. त्यांनी तिचा शोध सुरू केला तेव्हा पाण्याच्या डक्यात तिचा मृतदेह आढळून आला. डायघर पोलिसांच्या उपस्थितीमध्ये तिचा मृतदेह पुढील कार्यवाहीकरिता कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात पाठविण्यात आला आहे

जाहिरात

संबंधित ख़बरें

लेटेस्ट

ख़ास ख़बरें

error: Content is protected !!