
डोंबिवली ; सुशील पांचाळ
डोंबिवली पूर्वेतील आयरेगाव हद्दीतील अवैध बांधकामाप्रकरणी कल्याण डोंबिवली महापालिकेने कठोर कारवाई सुरु केली आहे.
आयरेगाव हद्दीतील टावरेपाडा परिसरात भूमाफियांनी काही वर्षांपूर्वी ‘साई समर्थ कॉम्प्लेक्स’ आणि ‘मल्हार हाईट्स’ या दोन बेकायदा इमारती उभारल्या आहेत. या प्रकरणी पालिकेच्या ‘ग’ प्रभागाने मल्हार हाईट्स ही अवैध इमारत उभारणाऱ्या भूमाफियांविरोधात ‘एमआरटीपी’ अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार पुढील कारवाई करणे आवश्यक असल्याने, संबंधित गुन्ह्याचा सखोल तपास व भूमाफियांची ओळख पटविण्यासाठी ‘ग’ प्रभागाच्या सहाय्यक आयुक्तांनी रामनगर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना पत्र पाठवले आहे.


