दुनिया में जो बदलाव आप देखना चाहते हैं, वह खुद बनिए. - महात्मा गांधी
Homeमहाराष्ट्रमुंब्रा स्थानकात प्रवाश्यावर ब्लेडने हल्ला एक आरोपी ताब्यात

मुंब्रा स्थानकात प्रवाश्यावर ब्लेडने हल्ला एक आरोपी ताब्यात

मुंब्रा ;प्रतिनिधी

मुंब्रा रेल्वे स्थानकाच्या कल्याण दिशेकडील पादचारी पुलावर डोंबिवलीतील ३० वर्षीय तरुणावर दोघांनी ब्लेडने वार करत मारहाण केल्याची घटना मंगळवारी सकाळी घडली. जखमी तरुण गांधीनगर कॉलनीतील रहिवासी असून डोंबिवलीतील एका शाळेच्या उपाहारगृहात काम करतो. तो मित्राला भेटण्यासाठी मुंब्रा येथे आला असताना दोघांनी त्याच्याकडे मोबाईल चोरीचा आरोप करत मोबाईल देण्याची मागणी केली व मारहाण केली. यावेळी एकाच्या हातातील ब्लेडने तरुणाच्या हातावर वार करण्यात आला. माहिती मिळताच रेल्वे पोलिसांनी हस्तक्षेप करून एक आरोपी ताब्यात घेतला, तर दुसरा फरार झाला. जखमीला कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्यात बीएनएस २०२३ अंतर्गत कलम ११८(१) व ३(५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

संबंधित ख़बरें

लेटेस्ट

ख़ास ख़बरें

error: Content is protected !!