
ठाणे ; निलेश घाग
वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या आशीर्वादाने, तसेच शिवसेना मुख्य नेते व उपमुख्यमंत्री मा. ना. श्री. एकनाथजी शिंदे साहेब यांच्या आदेशानुसार शिवसेना पक्षाचे लोकसभा संपर्कप्रमुख जाहीर करण्यात आले आहेत.
यानुसार,ठाणे लोकसभा संपर्कप्रमुख म्हणून डॉ. श्रीकांत शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली असून, कल्याण-भिवंडी लोकसभा संपर्कप्रमुख म्हणून नरेश म्हस्के यांची निवड करण्यात आली आहे.
तसेच इतर जिल्ह्यातील लोकसभा संपर्क प्रमुख नियुक्त्या पुढीलप्रमाणे जाहीर करण्यात आल्या आहेत –
◼️बुलढाणा – संजय सोनार
◼️अहिल्यानगर – राम रेपाळे
◼️बीड – मनोज शिंदे
◼️सांगली – योगेश जानकर
◼️सातारा – शरद कणसे
◼️रत्नागिरी – राजेश मोरे
◼️सिंधुदुर्ग – बाळा चिंदरकर
या नियुक्त्यांमुळे आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्ष संघटन अधिक मजबूत होण्यास मदत होणार असून कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

जाहिरात



