दुनिया में जो बदलाव आप देखना चाहते हैं, वह खुद बनिए. - महात्मा गांधी
Homeमहाराष्ट्ररत्नागिरीगुटखा आणि सुगंधित तंबाखूसह साडेपाच लाखांचा मुद्देमाल जप्त

गुटखा आणि सुगंधित तंबाखूसह साडेपाच लाखांचा मुद्देमाल जप्त

संगमेश्वर :- योगेश मुळे

गुटखा, सुगंधित तंबाखूची वाहतूक करणारी गाडी तांत्रिक बिघाडामुळे बंद पडली. मात्र, गाडीत गुटखा आणि सुगंधित तंबाखू असल्याची माहिती संगमेश्वर पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी जाऊन गाडी ताब्यात घेतली. या गाडीत तब्बल २,४६,६०० रुपयांचा गुटखा आणि सुगंधित तंबाखूचा साठा सापडला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही कारवाई मंगळवारी (दि. २६) रात्री पारेख पेट्रोलपंपासमोर करण्यात आली. या कारवाईत गाडीसह ५ लाख ४६ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या पारेख पेट्रोलपंपासमोर रस्त्याच्या कडेला एक संशयित कार उभी असून, त्यामध्ये प्रतिबंधित गुटख्याचा मोठा साठा असल्याची माहिती संगमेश्वर पोलिसांना दि. २६ मे रोजी रात्री मिळाली. पोलिसांनी त्या भागात शोधमोहीम राबवली. त्यावेळी तेथे एक कार (एमएच १४ बीके ४१२०) लॉक केलेल्या अवस्थेत पोलिसांना मिळाली. या गाडीमध्ये गुटखा आणि सुगंधित तंबाखूचा मोठा साठा सापडला. हा साठा विक्रीसाठी नेण्यात येत होता. मात्र, अचानक गाडीत तांत्रिक बिघाड झाल्याने ती तिथेच लॉक करून ठेवण्यात आली.
पोलिसांनी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या रत्नागिरी कार्यालयाला ही माहिती दिली. त्यानंतर बुधवारी सायंकाळी अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांच्या उपस्थितीत कारमधील मालाची तपासणी केली असता, केशरयुक्त विमल पानमसाला, विमल १ तंबाखू, प्रीमियम आरएमडी पानमसाला आणि एम. सेंटेड टोबॅको गोल्ड असा एकूण २,४६,६०० रुपये किमतीचा प्रतिबंधित गुटखा आणि सुगंधित तंबाखू तसेच गुन्ह्यात वापरलेली ३ लाखांची पोलिसांनी जप्त केली आहे.
संगमेश्वरचे पोलिस कॉन्स्टेबल कृणाल घोलप यांच्या फिर्यादीवरुन अज्ञातावर भारतीय न्याय संहिता कलम १२३, २२३, २७४,२७५ तसेच भारतीय दंड विधान कलम ३२८, १८८, २७२, २७३ आणि अन्नसुरक्षा व मानके कायदा २००६ च्या विविध कलमांसह गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस उपनिरीक्षक प्रवीण देसाई अधिक तपास करीत आहेत.

संबंधित ख़बरें

लेटेस्ट

ख़ास ख़बरें

error: Content is protected !!