दुनिया में जो बदलाव आप देखना चाहते हैं, वह खुद बनिए. - महात्मा गांधी
Homeमहाराष्ट्ररत्नागिरीपोलीस दलाची तात्काळ कारवाई;हर्णे येथील जीवघेण्या हल्ल्याच्यागुन्ह्यात आठ आरोपींना अटक

पोलीस दलाची तात्काळ कारवाई;हर्णे येथील जीवघेण्या हल्ल्याच्यागुन्ह्यात आठ आरोपींना अटक

दापोली :- दिनांक २७ मे २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ०६.३० वाजण्याच्या सुमारास हर्णे येथील गोवा किल्ला परिसरात घडलेल्या गंभीर मारहाणीच्या घटनेप्रकरणी दापोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर गुन्ह्यात आतापर्यंत एकूण ८ आरोपींना अटक करण्यात आली आहे.
फिर्यादी व जखमी चिन्मय सुधीर गुरव (वय २३, रा. हर्णे गुरववाडी, दापोली ) आणि मित्र महेंद्र रघुवीर हे दोघे गोवा किल्ला येथे फेरफटका मारण्यासाठी गेले असता आरोपी क्रमांक १ व २ हे त्यांच्या इतर साथीदारांसह किल्ला परिसरात उपस्थित होते. यावेळी “काल घडलेल्या घटनेचा व्हिडिओ व्हॉट्सॲप ग्रुपवर का टाकला?” या कारणावरून आरोपींनी फिर्यादी व जखमी यांच्याशी वाद घालून शिवीगाळ केली तसेच हाताने मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर आरोपींनी तेथे पडलेली लोखंडी शिग वापरुन दोघांवर जीवघेणा हल्ला केला. तसेच आरोपींसोबत असलेल्या १० – १५ मुलांनी देखील फिर्यादी व जखमी यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.
या मारहाणीत फिर्यादी व जखमी चिन्मय सुधीर गुरव (वय २३, रा. हर्णे गुरववाडी, दापोली ) आणि मित्र महेंद्र रघुवीर यांना डोके, तोंड, हात, पाय व पाठीवर गंभीर दुखापती झाल्या असून त्यांच्यावर वालावलकर रुग्णालय, डेरवण येथे उपचार सुरु आहेत. संबंधित साक्षीदारांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांच्यावरही उपचार सुरु आहेत.
फिर्यादी यांच्या तक्रारीवरून दापोली पोलीस ठाणे येथे गु.र.नं. १०९ /२०२६ भारतीय न्याय संहिता कलम १०९ , १८९ (२ ), १९१ (२ ), १९१ (३), १९० , ११५ (२ ), ५२, ३५१ (२ ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्याच्या तपासात खालील आरोपींना अटक करण्यात आली आहे.

१ ) जेन अस्लम हुनैरकर, वय २२ वर्षे
२ ) मुफीज जावेद सोलकर, वय २३ वर्षे
३ ) सलाह हसन कोडविलकर, वय १९ वर्षे
४ ) नबिल निसार काझी, वय १९ वर्षे
५ ) जैब ताजुद्दिन जमादार, वय २६ वर्षे
६ ) एक विधीसंघर्षित बालक
७ ) हर्षद अझीम हुनेरकर, वय २५ वर्षे
८) नाईफ आरिफ श्रीवर्धनकर, वय १९ वर्षे, सर्व आरोपी हर्णे बंदर मोहल्ला, ता. दापोली, जि. रत्नागिरी येथील राहणारे आहेत.
गुन्ह्यातील आरोपी क्रमांक १ ते ५ यांना दिनांक २८ मे २०२६ रोजी अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्यांना दिनांक १ जून २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पुढील तपासादरम्यान आरोपी जेन अस्लम हुनैरकर याच्याकडे चौकशी केली असता आरोपी हर्षद अझीम हुनेरकर व नाईफ आरिफ श्रीवर्धनकर यांचा सहभाग निष्पन्न झाल्याने त्यांनाही दिनांक २९ मे २०२६ रोजी अटक करण्यात आली आहे.
सदर गुन्ह्यात एका विधीसंघर्षित बालकाचाही सहभाग असल्याचे निष्पन्न झाले असून या गुन्ह्या मध्ये अन्य आरोपींचा सहभाग आहे का या बाबत गुन्ह्याचा अधिक तपास दापोली पोलीस ठाणे मार्फत सुरु आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक रत्नागिरी नितीन बगाटे, अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी खेड विभाग शैलेश सणस, पोलीस निरीक्षक महेश तोरस्कर (दापोली पोलीस ठाणे), पोलीस निरीक्षक नितीन ढेरे (स्था.गु.अ.शा., रत्नागिरी) व पथक तसेच दापोली पोलीस ठाण्याच्या खालील नमूद पोलीस अधिकारी व अंमलदारांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली आहे.

संबंधित ख़बरें

लेटेस्ट

ख़ास ख़बरें

error: Content is protected !!