दुनिया में जो बदलाव आप देखना चाहते हैं, वह खुद बनिए. - महात्मा गांधी
Homeमहाराष्ट्रठाणेआज ठाण्यात २४ तास पाणीपुरवठा राहणार बंद; मुंब्रा, दिवा, मानपाडामध्ये परिणाम

आज ठाण्यात २४ तास पाणीपुरवठा राहणार बंद; मुंब्रा, दिवा, मानपाडामध्ये परिणाम

ठाणे ; कल्याणी मोरे

  • गुरूवारी, ४ जून रोजी, जिल्ह्यातील अनेक प्रभागांमध्ये पाणीपुरवठा २४ तासांसाठी बंद राहील.

हवामान विभागाने यंदा एल निनोच्या प्रभावामुळे कमी पाऊस होण्याची शक्यता आहे. सरासरीच्या ९० टक्केच पाऊस होईल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. गेल्या ११ वर्षांतील सर्वात कमी पाऊस होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पाणी टंचाईची स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. ठाणे जिल्ह्यातील काही भागांत ४ जून ते ५ जूनदरम्यान, २४ तासांसाठी पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे.

ठाणे महानगरपालिका क्षेत्रात मुंब्रा, दिवा, कळवा, माजिवडा- मानपाडा व वागळे (काही भागात) प्रभाग समिती मध्ये महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळामार्फत पाणी पुरवठा करण्यात येतो. एल निनो व आयओडीच्या प्रभावामुळे समुद्र प्रवाह सक्रिय झाल्यामुळे पावसाळा लांबण्याची शक्यता आहे. याबाबत जलसंपदा विभागाबरोबर दिनांक १४ मे रोजी झालेल्या आढावा बैठकीच्या निर्णयप्रमाणे आगामी पाणीटंचाईची परिस्थ‍िती उद्भवू नये म्हणून पाणी कपात करण्याचे ठरले आहे. त्यानुसार महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे जांभूळ जलशुध्दीकरण केंद्र येथून होणारा पाणीपुरवठा गुरूवार दिनांक ०४ जून रोजी दुपारी १२.०० वाजल्यापासून ते शुक्रवार दिनांक ०५ जून रोजी दुपारी १२.०० वाजेपर्यंत बंद राहणार आहे.

सदर शटडाऊनच्या कालावधीत ठाणे महानगरपालिकेअंतर्गत दिवा, मुंब्रा (प्रभाग क्र. २६ व ३१ चा काही भाग वगळता) आणि कळवा प्रभाग समिती मधील सर्व भागांमध्ये परिणाम होणार आहे. शिवाय वागळे प्रभाग समितीमधील रुपादेवी पाडा, किसननगर नं. २ नेहरुनगर तसेच मानपाडा प्रभाग अंतर्गत कोलशेत खालचा गाव येथील पाणीपुरवठा २४ तासांसाठी पूर्णपणे बंद राहील.

भारत सरकार मान्यता प्राप्त RNI No.
MAHMAR2014/५९६९८

संबंधित ख़बरें

लेटेस्ट

ख़ास ख़बरें

error: Content is protected !!