दुनिया में जो बदलाव आप देखना चाहते हैं, वह खुद बनिए. - महात्मा गांधी
Homeमहाराष्ट्रठाणेठाणे महापालिकेत १७७३ पदांची मेगाभरती; सहा महिन्यांच्या विलंबानंतर एप्रिल २०२६ पासून भरती...

ठाणे महापालिकेत १७७३ पदांची मेगाभरती; सहा महिन्यांच्या विलंबानंतर एप्रिल २०२६ पासून भरती प्रक्रिया पुन्हा सुरू

ठाणे ; सुशांत पाटील

ठाणे महानगरपालिकेत (TMC) गट-क आणि गट-ड संवर्गातील एकूण १७७३ रिक्त पदांसाठी मेगाभरती प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे. ऑगस्ट २०२५ मध्ये या भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. मात्र त्यानंतर निवडणुकांची आचारसंहिता आणि काही तांत्रिक अडचणींमुळे ही प्रक्रिया जवळपास सहा महिने रखडली होती. आता सर्व अडथळे दूर झाल्याने एप्रिल २०२६ पासून प्रत्यक्ष भरती प्रक्रिया पुन्हा सुरू होणार असल्याची माहिती समोर आली आहे.

या मेगाभरतीत प्रामुख्याने आरोग्य विभाग, अग्निशमन विभाग, तांत्रिक विभाग तसेच प्रशासकीय पदांवर मोठ्या प्रमाणावर भरती केली जाणार आहे. आरोग्य विभागात परिचारिका, प्रसविका, लॅब टेक्निशियन, वॉर्ड बॉय यांसारख्या पदांचा समावेश असून अग्निशमन विभागात फायरमन पदांसाठी मोठ्या प्रमाणावर जागा आहेत. तांत्रिक विभागात कनिष्ठ अभियंता तर प्रशासकीय विभागात लिपिक पदांसाठीही भरती केली जाणार आहे.

जाहिरात

महापालिकेच्या माहितीनुसार, या भरतीमध्ये परिचारिका (स्टाफ नर्स) – ५५७, फायरमन – ३८९, चालक/यंत्रचालक – २७७, प्रसविका – ११७, कनिष्ठ अभियंता (विविध) – ९१, लिपिक व लेखा लिपिक – ८५, दवाखाना आया – ४८, वॉर्ड बॉय – ३७, अटेंडंट – २८, ईसीजी टेक्निशियन – १९, लॅब टेक्निशियन – १५ तसेच शिपाई, सफाई कामगार आदी इतर पदांचा समावेश आहे.

या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया ऑगस्ट २०२५ ते २ सप्टेंबर २०२५ या कालावधीत ऑनलाइन पद्धतीने पूर्ण झाली होती. त्यामुळे नवीन अर्ज सध्या स्वीकारले जाणार नाहीत. ज्यांनी त्या कालावधीत अर्ज केले आहेत, त्यांच्या अर्जांची सध्या छाननी अंतिम टप्प्यात असल्याचे सांगितले जात आहे.
निवड प्रक्रियेत ऑनलाइन CBT (Computer Based Test) परीक्षा, त्यानंतर कागदपत्र पडताळणी अशा टप्प्यांचा समावेश असेल. ही परीक्षा नामांकित संस्थेमार्फत घेतली जाणार असून संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक ठेवण्यात येणार आहे.

दरम्यान, एप्रिल २०२६ च्या दुसऱ्या आठवड्यात परीक्षेचे वेळापत्रक जाहीर होण्याची शक्यता असून उमेदवारांनी नियमितपणे ठाणे महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर अद्ययावत माहिती तपासण्याचे आवाहन करण्यात आले आहे

संबंधित ख़बरें

लेटेस्ट

ख़ास ख़बरें

error: Content is protected !!