
दिवा ; निलेश पांडुरंग घाग
कोकणवासियांच्या वर्षानुवर्षांच्या मागणीवर पाणी
कोकणवासियांवर अन्याय झाल्याचे समोर आले आहे. दादर-रत्नागिरी पॅसेंजर कायमची बंद करण्यात आली आहे. त्याजागी आता दादर-गोरखपूर ट्रेन सुरू केली आहे. यामुळे संताप व्यक्त होत आहे.
दादर-गोरखपूर रेल्वे सेवेला नियमित एक्सप्रेस ट्रेन म्हणून चालवण्यास मंजुरी देण्यात आली आहे. केंद्रीय रेल्वे आणि माहिती व प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी गोरखपूरचे खासदार रवी किशन यांना पाठवलेल्या अधिकृत पत्रातून याला दुजोरा देण्यात आला आहे. मात्र यामुळे कोकणवासियांवर अन्याय झाला आहे. ज्या गाडीसाठी कोकणवासियांनी लढा दिला ती दादर-रत्नागिरी पॅसेंजर बंद करण्यात आली आहे.

जाहिरात

जाहिरात



