
ठाणे ; निलेश घाग
ठाणे जिल्हा पोलीस आयुक्तालयाने कायदा-सुव्यवस्था प्रभावीपणे राखण्यासाठी 8000 पोलीस मित्र शहरातील विविध भागात तैनात केले आहेत. या पोलीस मित्र संकल्पनेअंतर्गत स्थानिक रहिवासी पोलिसांसोबत सहकार्य करून वाहतूक नियंत्रण, शंकास्पद हालचालींची माहिती देणे, जनजागृती करणे आणि गुन्हे प्रतिबंधक उपाययोजना यासारख्या जबाबदाऱ्या पार पाडतील.
हा उपक्रम ठाणे, भिवंडी, कल्याण, उल्हासनगर आणि बदलापूरसह परिसरात राबवण्यात आला असून, नागरिकांना ‘पोलीस मित्र’ म्हणून सहभागी होण्याची संधी दिली आहे. पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबवला जात असून, स्थानिक समाजात नागरिकांचा सहभाग कायदा-सुव्यवस्था मजबूत करण्यास महत्त्वपूर्ण ठरेल.
भारत सरकार मान्यता प्राप्त RNI No.
MAHMAR2014/५९६९८


जाहिरात


