
रत्नागिरी ; प्रतिनिधी
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुका अध्यक्ष कुठल्याही पक्षाच्या आमिषाला बळी रुपेशजी जाधव यांचा वाढदिवस रत्नागिरीतील “माहेर” या संस्थेत साजरा करण्यात आला.. राजकारणात काम करताना आदरणीय राजसाहेबांचे सामाजिक बांधिलकीचे विचार आजपर्यंत मी जोपासत आलोय..त्याचाच एक भाग म्हणून गेली २९ वर्ष समाजातील उपेक्षित घटकांना मायेची सावली देणाऱ्या रत्नागिरीतील ” माहेर” या संस्थेला सीलिंग फॅन संच, वॉटर गिझर इत्यादी इलेक्ट्रिकल भेटवस्तू तसेच अन्न धान्य किट देण्यात आल्या..याप्रसंगी “माहेर” या संस्थेचे कार्यवाह श्री. सुनील कांबळे , त्यांचे सर्व सहकारी तसेच या आश्रमातील या “माहेर” परिवाराने माझ्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन करून माझा आनंद द्विगुणित केला…यावेळी मित्रवर्य श्री पप्पू शितप तसेच माझे सहकारी.श्री. राजू पाचकुडे, रोहन शेलार, सर्वेश जाधव, मार्विक नारकर, विशाल नाणीजकर, आदित्य चव्हाण आदी मनसे पदाधिकारी व महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.



