
ठाणे; निलेश घाग
सदरची बैठक आमदार राजेश जी मोरे यांच्या प्रयत्नाने जिल्हाधिकारी साहेबांसोबत आयोजित केली होती. या बैठकी मध्ये जिल्हाधिकारी साहेबांनी सांगितलं कि येणाऱ्या आठवड्यामध्ये ठाणे महानगरपालिका अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून त्यांना निवेदन पत्र देण्यात येईल व शेतकऱ्यांना योग्य तो मोबदला देण्यात येईल.
या बैठकीत शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीचा योग्य व न्याय्य मोबदला देण्यात येईल, यावर अधिकृतपणे शिक्कामोर्तब करण्यात आले. हा निर्णय शेतकऱ्यांसाठी दिलासादायक ठरणार आहे.
यावेळी माझ्यासोबत कल्याण ग्रामीणचे आमदार मा. राजेशजी मोरे साहेब,नगरसेवक बाबाजी पाटील साहेब , नगरसेवक गजानन पाटील साहेब , मधुकर पाटील, सुनील पवार, पंढरी पाटील, राकेश भोईर, राम पाटील, अनंता म्हात्रे, किशोर म्हात्रे, सावन ठाकूर, निखिल देवकर व शेतकरी उपस्थित होते.


