
नवी मुंबई ; प्रतिनिधी
ऐरोली सेक्टर २० (बी) परिसरात बांधकामांमधून निर्माण होणारा डेब्रिज उघड्यावर टाकण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात सुरू असल्याचे पाहणीदरम्यान उघड झाले आहे. काही ठिकाणी डंपरद्वारे डेब्रिज टाकला जात असल्याचेही आढळून आले, ज्यामुळे पावसाळी नाल्यांची सुरक्षा भिंत तुटलेली असल्याचे पाहायला मिळाले. यावर तीव्र नाराजी व्यक्त करत प्रशासनाने तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना डेब्रिज माफियांविरोधात कडक कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले असून, बेकायदेशीर डेब्रिज टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.


