दुनिया में जो बदलाव आप देखना चाहते हैं, वह खुद बनिए. - महात्मा गांधी
Homeमहाराष्ट्रठाणे महापालिकेतर्फे १५ जूनला परिमंडळ लोकशाही दिनाचे आयोजन

ठाणे महापालिकेतर्फे १५ जूनला परिमंडळ लोकशाही दिनाचे आयोजन

०१ जून २०२६ पर्यंत निवेदन सादर करण्याचे आवाहन

ठाणे ; निलेश घाग

नागरिकांच्या वैयक्तिक तक्रारींचा निपटारा तातडीने होण्यासाठी तालुकास्तरिय लोकशाही दिनाच्या धर्तीवर, ठाणे महानगरपालिकेच्यावतीने दर महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी परिमंडळ स्तरावरही लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. त्यानुसार, सोमवार, १५ जून २०२६ रोजी परिमंडळ लोकशाही दिन होणार आहे. या लोकशाही दिनासाठी नागरिकांनी आपली निवेदने ०१ जून पर्यंत सादर करण्याचे आवाहन ठाणे महानगरपालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.

नागरिकांनी आपली निवेदने पुढील ठिकाणी सादर करावीत.

परिमंडळ १ – (कळवा, मुंब्रा, दिवा प्रभाग समिती अंतर्गत) उपायुक्त कार्यालय, कळवा प्रभाग समिती कार्यालय, कळवा

परिमंडळ २ – (नौपाडा, वागळे प्रभाग समिती अंतर्गत, उपायुक्त कार्यालय, नौपाडा प्रभाग समिती कार्यालय, ठाणे (प.)

परिमंडळ ३ – (उथळसर, वर्तकनगर, लोकमान्य. सावरकरनगर, माजिवडा मानपाडा प्रभाग समिती अंतर्गत) उपायुक्त कार्यालय, माजिवडा मानपाडा प्रभाग समिती कार्यालय, ठाणे (प.)

नागरिकांनी प्रथमतः परिमंडळ लोकशाही दिनात अर्ज दाखल करावेत. परिमंडळ लोकशाही दिनात दाखल केलेल्या तक्रारींवर कोणतीही कार्यवाही झाली नसल्यास नागरिक महापालिका लोकशाही दिनामध्ये नियमानुसार १५ दिवस आधी आपली निवेदने सादर करू शकतील. नागरिकांनी परिमंडळ लोकशाही दिनासाठी आपली निवेदने संबंधित परिमंडळ कार्यालयात सादर करावीत.

भारत सरकार मान्यता प्राप्त RNI No.
MAHMAR2014/५९६९८

संबंधित ख़बरें

लेटेस्ट

ख़ास ख़बरें

error: Content is protected !!