दुनिया में जो बदलाव आप देखना चाहते हैं, वह खुद बनिए. - महात्मा गांधी
Homeभारतनई दिल्लीWHO नं घोषित केली आणीबाणी,केंद्र सरकारही अलर्ट! आंतरराष्ट्रीय विमानतळांसाठी 'ॲडव्हायझरी' जारी,२१ दिवसांचा...

WHO नं घोषित केली आणीबाणी,केंद्र सरकारही अलर्ट! आंतरराष्ट्रीय विमानतळांसाठी ‘ॲडव्हायझरी’ जारी,२१ दिवसांचा नियम लागू

नवी दिल्ली: प्रतिनिधी

इबोला व्हायरसने काही आफ्रिकन देशात थैमान घातले आहे. या पार्श्वभूमीवर, जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) डेमोक्रेटिक रिपब्लिक ऑफ काँगो आणि युगांडामध्ये पसरलेल्या इबोलाला ‘पब्लिक हेल्थ इमर्जन्सी ऑफ इंटरनॅशनल कन्सर्न’ अर्थात आंतरराष्ट्रीय चिंतेची सार्वजनिक आरोग्य आणीबाणी घोषित केली आहे. यानंतर आता, केंद्रीय आरोग्य तथा कुटुंब कल्याण मंत्रालयानेही या व्हायरसच्या पार्श्वभूमीवर सतर्कता वाढवली आहे. मोदी सरकार या संपूर्ण परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे.

भारत सरकारची विमानतळांसाठी विशेष ॲडव्हायझरी –
इबोलाच्या पार्श्वभूमीवर, महासंचालक आरोग्य सेवा (DGHS) यांनी सर्व आंतरराष्ट्रीय विमानतळांना ॲडव्हायझरी पाठवली आहे. विशेषतः डीआर काँगो, युगांडा आणि दक्षिण सुदान यांसारख्या हाय रिस्क असलेल्या देशांमधून येणाऱ्या प्रवाशांसाठी ही सतर्कता आहे. महत्वाचे म्हणजे, ॲडव्हायझरीमध्ये, जर एखाद्या प्रवाशामध्ये ताप, डोकेदुखी, अशक्तपणा, उलट्या-जुलाब, घशात खवखव किंवा रक्तस्त्राव यांसारखी लक्षणे आढळली, तर त्याने इमिग्रेशनपूर्वीच विमानतळ आरोग्य अधिकाऱ्याला (Airport Health Officer) या यासंदर्भात माहिती देणे आवोश्यक असेल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

“देशासाठी धोका कमी, पण…”

महत्वाचे म्हणजे, आरोग्य मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आणि राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्र तथा एकात्मिक रोग देखरेख कार्यक्रमाने (IDSP) परिस्थितीचा आढावा घेतला आहे. तसेच, सार्वजनिक आरोग्य उपाय मजबूत करण्याचे निर्देशही दिले आहेत. आरोग्य मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने म्हटले आहे की, “सध्या भारतात इबोलाचा एकही रुग्ण आढळलेला नाही. देशासाठी याचा धोका फार कमी आहे. मात्र, खबरदारी म्हणून ही तयारी केली जात आहे.

असा असेल २१ दिवसांचा नियम –

याशिवया, संसर्गित रुग्णाच्या रक्ताच्या अथवा बॉडी फ्लुइडच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींवरही लक्ष ठेवले जात आहे. भारतात आल्यानंतर २१ दिवसांच्या आत लक्षणे आढळल्यास, तत्काळ डॉक्टरांशी संपर्क साधून आपली ट्रॅव्हल हिस्ट्री सांगण्याचे निर्देशही ॲव्हायजरीमध्ये देण्यात आले आहेत. महत्वाचे म्हणजे, ‘एअरपोर्ट हेल्थ ऑर्गनायझेशन’ या संपूर्ण प्रक्रियेवर लक्ष ठेवून आहे. प्रवाशांना स्क्रिनिंगमध्ये सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

संबंधित ख़बरें

लेटेस्ट

ख़ास ख़बरें

error: Content is protected !!