
ठाणे; निलेश घाग
टिटवाळा परिसरातील बनेली, वडवली, मोहणे, उभारणी आणि मांडा या भागात गेल्या काही वर्षांत अनधिकृत बांधकामांचे जणू पीकच आले आहे. भूमाफिया आणि चाळ माफियांनी या सरकारी जमिनींवर अतिक्रमण करून तब्बल १००० हून अधिक अनधिकृत चाळी उभारल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
या संपूर्ण प्रकरणात जवळपास ६०० कोटी रुपयांची उलाढाल झाल्याचा दावा केला जात आहे. गेल्या १० वर्षांपासून हेच चक्र सुरू आहे. एकदा कारवाई झाली की ती जागा काही दिवसांनी पुन्हा माफियांच्या ताब्यात जाते, तिथे पुन्हा नवीन चाळी उभ्या राहतात आणि पुन्हा नवीन लोकांची फसवणूक केली जाते.
या रॅकेटमध्ये विविध विभागांतील अधिकारी आणि स्थानिक राजकीय घटकांचे संगनमत असल्याचा गंभीर आरोप काँग्रेसने केला आहे. आर्थिक लाभासाठी सरकारी यंत्रणा आणि माफिया हातमिळवणी करत असल्यानेच हे अवैध धंदे फोफावत असल्याचे बोलले जात आहे.
भारत सरकार मान्यता प्राप्त RNI No.
MAHMAR2014/५९६९८


