दुनिया में जो बदलाव आप देखना चाहते हैं, वह खुद बनिए. - महात्मा गांधी
Homeमहाराष्ट्रकोकण रेल्वेचा कायापालट होणार, दुपदरीकरणावर भर; ट्रेन वाढणार

कोकण रेल्वेचा कायापालट होणार, दुपदरीकरणावर भर; ट्रेन वाढणार

मुंबई :- केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी कोकण रेल्वेच्या विकासासाठी आणि सक्षमीकरणासाठी ५१५ कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पीय तरतुदीची घोषणा केली आहे.
महाराष्ट्रात सुरू असलेल्या विविध रेल्वे प्रकल्पांसाठी केंद्रीय अर्थसंकल्पात २३ हजार ९२६ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी रेल्वे प्रकल्पांसाठीची अर्थसंकल्पीय तरतुदींची माहिती दिली. राज्यात १ लाख ७० हजार कोटी रुपयांचे प्रकल्पांचे काम सुरू आहे. यात दुहेरीकरण, चौपदरीकरण अशा मार्गांचा समावेश आहे.
मुंबई-कोकण मार्गासह संपूर्ण कोकण रेल्वेचे दुहेरीकरण करण्याची प्रक्रिया सुरू आहे. याचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यात आला असून, तो मंजुरीच्या प्रक्रियेत आहे. यात बोगद्यांचे मजबुतीकरण, रुळांचे अद्यावतीकरण यांसह अन्य तांत्रिक कामांचा समावेश आहे. टप्प्याटप्प्याने होणारे दुहेरीकरण पूर्ण झाल्यावर कोकण रेल्वेवरील प्रवासी ट्रेनची संख्या वाढवण्यात येणार आहे.
केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी कोकण रेल्वेच्या विकासासाठी आणि सक्षमीकरणासाठी ५१५ कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पीय तरतुदीची घोषणा केली आहे. या भरीव निधीमुळे कोंकण रेल्वेच्या आधुनिकीकरणाला मोठी गती मिळणार असून, या भागातील दळणवळण व्यवस्था अधिक मजबूत होणार आहे. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी कोंकण रेल्वेच्या विकासासाठी अर्थसंकल्पीय तरतुदीची घोषणा केली. कोंकण रेल्वे ही केवळ एक रेल्वे मार्ग नसून देशाच्या संपूर्ण किनारपट्टी भागाला जोडणारी एक महत्त्वाची जीवनवाहिनी आहे.
वाढती प्रवासी संख्या आणि मालवाहतूक लक्षात घेता, या मार्गाची क्षमता वाढवणे ही काळाची गरज बनली आहे, असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.
रेल्वे मंत्र्यांनी पुढे स्पष्ट केले की, कोंकण रेल्वेच्या महत्त्वाच्या विभागांचे दुपदरीकरण करण्यासाठी आणि रेल्वे सुधारणेसाठीचा सविस्तर प्रकल्प अहवाल आता पूर्ण झाला आहे. सध्या हा अहवाल मंजुरीच्या प्रक्रियेत असून, त्याला लवकरच अंतिम स्वरूप दिले जाईल.
कोंकण रेल्वेचा मार्ग भौगोलिकदृष्ट्या आव्हानात्मक आहे. त्यामुळेच, या मार्गावरील बोगद्यांचे मजबुतीकरण आणि ट्रॅकच्या जुन्या तंत्रज्ञानात सुधारणा करण्यासाठी या निधीचा विनियोग केला जाणार आहे. ५१५ कोटींच्या या अर्थसंकल्पामुळे कोंकण रेल्वेची क्षमता तर वाढेलच, पण त्याचबरोबर किनारपट्टी भागातील जोडणीमध्ये मोठी सुधारणा होईल.
या नवीन अर्थसंकल्पात केवळ विस्तारावरच नाही, तर सुरक्षिततेवरही विशेष लक्ष देण्यात आले आहे. रेल्वे अपघात रोखण्यासाठी ‘कवच’ ही सुरक्षा प्रणाली कोंकण रेल्वेवर कार्यान्वित करण्याचा प्रस्ताव आहे, अशी माहिती वैष्णव यांनी दिली.
कोकण रेल्वेला ‘कवच’ आणि दुहेरी करणालाही मंजुरी देण्यात आली आहे. मुंबई-गोवा या कोकण मार्गाच्या दुहेरीकरणाला मंजुरी देण्यात आली आहे. कोकण रेल्वे मार्गावर नव्या तंत्रज्ञानावर आधारित ‘कवच’ सुरक्षा प्रणाली बसवण्यात येणार आहे. त्यामुळे प्रवास निर्धोक होईल, असेही रेल्वेमंत्री म्हणाले.

संबंधित ख़बरें

लेटेस्ट

ख़ास ख़बरें

error: Content is protected !!