
ठाणे : निलेश पांडुरंग घाग
वैद्यकीय उपचारासाठी आणलेली ५० हजारांची रोख रक्कम आणि सुमारे चार तोळे सोन्याचे दागिने असलेली बॅग रिक्षामध्ये विसरलेल्या महिलेस मानपाडा पोलीसांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे शोधून परत मिळवून दिली. पोलिसांच्या या तत्पर आणि कौतुकास्पद कामगिरीमुळे नागरिकांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित महिला वैद्यकीय उपचारासाठी जात असताना रिक्षामध्ये आपली बॅग विसरून उतरल्या होत्या. काही वेळानंतर बॅग हरवल्याचे लक्षात येताच त्यांनी मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. बॅगेमध्ये ५० हजार रोख रक्कम तसेच अंदाजे चार तोळे सोन्याचे दागिने असल्याने पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला.
पोशि/७५८८ पंढरीनाथ सांगळे यांनी सपोफौ सुनिल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तांत्रिक माहिती आणि कौशल्यपूर्ण तपासाच्या आधारे संबंधित रिक्षाचा शोध घेतला. त्यानंतर रिक्षाचालकाकडून सदर बॅग हस्तगत करण्यात आली.
यानंतर मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीपान शिंदे यांच्या हस्ते सदर बॅग तक्रारदार महिलेला सुपूर्त करण्यात आली. मानपाडा पोलिसांच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
भारत सरकार मान्यता प्राप्त RNI No.
MAHMAR2014/५९६९८
जाहिरात




