दुनिया में जो बदलाव आप देखना चाहते हैं, वह खुद बनिए. - महात्मा गांधी
Homeमहाराष्ट्रठाणे महानगर पालिकेत नगरसेवकांचा पेन्शनचा प्रस्ताव पुन्हा चर्चेत

ठाणे महानगर पालिकेत नगरसेवकांचा पेन्शनचा प्रस्ताव पुन्हा चर्चेत

ठाणे ; प्रतिनिधी

ठाणे महानगरपालिकेत नगरसेवकांना आमदार-खासदारांप्रमाणे निवृत्ती वेतन (पेन्शन) लागू करण्याचा प्रस्ताव पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. या मुद्द्यावर राजकीय वर्तुळात लक्ष केंद्रित झाले आहे.

माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांनी दोन वेळा निवडून आलेल्या नगरसेवकांसाठी पेन्शन योजना लागू करण्याची सूचना महापालिकेच्या सभेपुढे मांडली आहे. या प्रस्तावानुसार, सलग दोन कार्यकाळ निवडून आलेल्या नगरसेवकांना निवृत्ती वेतनाचा लाभ देण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली असून नगरसेवकांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांना आर्थिक सुरक्षितता मिळावी हा उद्देश असल्याचे सांगण्यात आले आहे.

तसेच विद्यमान नगरसेवकांसाठी अधिकृत ओळख बॅच देण्याचाही स्वतंत्र प्रस्ताव चर्चेत आहे. या दोन्ही प्रस्तावांवर होणाऱ्या चर्चेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

संबंधित ख़बरें

लेटेस्ट

ख़ास ख़बरें

error: Content is protected !!