दुनिया में जो बदलाव आप देखना चाहते हैं, वह खुद बनिए. - महात्मा गांधी
Homeमहाराष्ट्रठाण्यातील ट्युटोरियलमधील शिक्षकावर लैंगिक अत्याचाराचा गंभीर गुन्हा दाखल

ठाण्यातील ट्युटोरियलमधील शिक्षकावर लैंगिक अत्याचाराचा गंभीर गुन्हा दाखल

ठाणे ; शिवप्रसाद साटम

ठाण्यातील एका ट्युटोरियल इन्स्टिट्यूटमध्ये १७ वर्षीय विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली असून, या प्रकरणी आरोपी मिलेश कोठारी शिक्षकाविरुद्ध कासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी शिक्षकाने संस्थेच्या वर्गखोलीत एकटे पाहून पीडित मुलीला जबरदस्तीने मिठी मारण्याचा प्रयत्न केला आणि “माझ्या डिपार्टमेंटमध्ये ये, मी तुला एक तास १,००० रुपये देतो,” असे म्हणत पैशांचे आमिष दाखवून तिला छळण्याचा प्रयत्न केला. इतकेच नाही तर, इंस्टाग्रामवर फॉलो न केल्याच्या रागातून आरोपीने पीडितेचा गळा दाबून तिचा जीव घेण्याचा प्रयत्न केला आणि तिच्या जीन्सच्या पट्ट्यात हात घालून लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. घटनेच्या रात्री पीडितेने या प्रकाराची माहिती संस्थेतील आपल्या सहकाऱ्यांना दिल्यानंतर, कुटुंबीयांनी तत्काळ पोलीस गाठले. या गंभीर प्रकरणात पोलिसांनी FIR क्र. 0258/2026 नोंदवून आरोपीवर POCSO कायदा तसेच भारतीय न्याय संहिता कलम ७४ आणि ७५ अंतर्गत गुन्हा दाखल केला असून, कासारवडवली पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.

संबंधित ख़बरें

लेटेस्ट

ख़ास ख़बरें

error: Content is protected !!