
ठाणे ; विशेष प्रतिनिधी
- कापूरबावडी पोलीस ठाणे हद्दीतील कल्पतरू पॅरामाउंट सोसायटी येथे
स्नॅचिंग, मोबाईल स्नॅचिंग, ऑनलाईन फसवणूक, सायबर सुरक्षा तसेच अमली पदार्थांबाबत सविस्तर जनजागृती मोहीम राबवण्यात आली
कापूरबावडी पोलीस ठाणे येथे परिसरातील सोसायटी पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली.
सदर बैठकीमध्ये चेन स्नॅचिंग, मोबाईल स्नॅचिंग, ऑनलाईन फसवणूक, सायबर सुरक्षा तसेच अमली पदार्थांबाबत सविस्तर जनजागृती करण्यात आली. या बैठकीस सुमारे ३० ते ४० सोसायटीचे पदाधिकारी उपस्थित होते.तसेच कापूरबावडी पोलीस ठाणे हद्दीतील कल्पतरू पॅरामाउंट सोसायटी येथे रहिवासी नागरिक, महिला, लहान मुले व ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी
सायबर जनजागृती, ऑनलाईन फसवणूक, महिला सुरक्षा व ज्येष्ठ नागरिकांवरील फसवणुकीच्या गुन्ह्यांबाबत
पोलीस उपनिरीक्षक श्री. सांगळे, ईगल ब्रिगेड फाउंडेशनचे श्री. विश्वनाथ बीवलकर, गोपनीय अंमलदार व पोलीस हवालदार गरजे यांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमास सुमारे १०० ते १५० नागरिक उपस्थित होते.

जाहिरात

जाहिरात



