दुनिया में जो बदलाव आप देखना चाहते हैं, वह खुद बनिए. - महात्मा गांधी
Homeमहाराष्ट्रठाणेठाणे जिल्हा रुग्णालयात कचऱ्याचे ढीग ;प्रशासनाचा कानाडोळा

ठाणे जिल्हा रुग्णालयात कचऱ्याचे ढीग ;प्रशासनाचा कानाडोळा

ठाणे ; विशेष प्रतिनिधी

ठाणे येथील विठ्ठल सायन्ना जिल्हा सामान्य रुग्णालय परिसरात मोठ्या प्रमाणावर कचऱ्याचे ढीग साचल्याने रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

रुग्णालयाच्या आवारात वापरलेले हातमोजे, वैद्यकीय कचरा तसेच इतर घाण उघड्यावर टाकली जात असल्याचे चित्र असून स्वच्छतागृहांचीही दुरावस्था झाली आहे. त्यामुळे संसर्गजन्य आजारांचा धोका वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना अस्वच्छ वातावरणाचा सामना करावा लागत असून, आरोग्य यंत्रणेच्या निष्काळजीपणाबद्दल नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. संबंधित प्रशासनाने तातडीने स्वच्छता मोहीम राबवून परिस्थिती सुधारावी, अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे.

संबंधित ख़बरें

लेटेस्ट

ख़ास ख़बरें

error: Content is protected !!