दुनिया में जो बदलाव आप देखना चाहते हैं, वह खुद बनिए. - महात्मा गांधी
Homeमहाराष्ट्रमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ;ठाणे बोरीवली टनेल प्रकल्पाचा शुभारंभ

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ;ठाणे बोरीवली टनेल प्रकल्पाचा शुभारंभ

ठाणे- विशेष प्रतिनिधी

बोरीवली ट्वीन टनेलच्या बोअर मशीनचा शुभारंभ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. ठाणे-बोरीवली ट्वीन टनेल हा देशातील सर्वात लांब दुहेरी बोगदा असून, ठाणे व बोरीवली यांना जोडणाऱ्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे वाहतूक कोंडी कमी होऊन प्रवास अधिक वेगवान, सुरक्षित आणि सुलभ होणार आहे.

पायाभूत सुविधांच्या बळकटीकरणामुळे ठाण्याच्या विकासाला नवी गती मिळेल, तसेच हा उपक्रम वेळ आणि इंधनाची बचत करून पर्यावरण संवर्धनालाही हातभार लावणार आहे.

याप्रसंगी ठाणे जिल्हा पालकमंत्री, उपमुख्यमंत्री, परिवहन मंत्री, ठाणे शहर भाजप आमदार संजय केळकर, भाजप आमदार निरंजन डावखरे, महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी, ठाणे महानगरपालिका आयुक्त सौरभ राव, महापौर शर्मिला पिंपळोलकर, भाजप उपमहापौर कृष्णा पाटील आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

जाहिरात

संबंधित ख़बरें

लेटेस्ट

ख़ास ख़बरें

error: Content is protected !!