दुनिया में जो बदलाव आप देखना चाहते हैं, वह खुद बनिए. - महात्मा गांधी
Homeमहाराष्ट्रराज्यभरात ७ जिल्ह्यातील १२ आयुर्वेदिक औषध विक्री आस्थापनामध्ये धडक कारवाई

राज्यभरात ७ जिल्ह्यातील १२ आयुर्वेदिक औषध विक्री आस्थापनामध्ये धडक कारवाई

मुंबई; प्रतिनिधी

राज्यभरात ७ जिल्ह्यातील १२ आयुर्वेदिक औषधविक्री आस्थापनामध्ये धडक कारवाई करून ७३ लाख २४ हजार ६५६ रुपये किमतीचा साठा जप्त करण्यात आला आहे. राज्यभरात आक्षेपार्ह जाहिराती असलेला व मिसब्रँडेड औषध साठा जप्त करून कायदेशीर कारवाई सुरू आहे.

जनतेच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला किंवा आस्थापनेला प्रशासनाकडून कोणतीही सवलत दिली जाणार नाही. भ्रामक व दिशाभूल करणाऱ्या जाहिराती प्रसिद्ध करणे आणि अवैध औषध उत्पादन व विक्रीविरुद्धची कारवाई यापुढे अधिक कठोर आणि सातत्यपूर्ण असेल, असा स्पष्ट इशारा अन्न व औषध प्रशासनाचे (एफडीए) आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिला आहे.

संबंधित ख़बरें

लेटेस्ट

ख़ास ख़बरें

error: Content is protected !!